शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला ‘जोर का धक्का’

By admin | Updated: November 3, 2015 03:14 IST

जिल्ह्यातील हिंगणा, कुही, भिवापूर या तीन नगर पंचायत निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. भाजपने सर्वाधिक १४

नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा, कुही, भिवापूर या तीन नगर पंचायत निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. भाजपने सर्वाधिक १४ जागांवर कब्जा केला असला तरी कुठेच बहुमत प्राप्त करता आले नाही. काँग्रेसने १३ जागा मिळवित पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे हिंगण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत प्राप्त केले. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असे दिग्गज असताना त्यांच्याच गृहजिल्ह्यात या निवडणुकीत भाजपला ‘जोर का धक्का’ बसला. त्यासोबतच भिवापुरात बसपाने मुसंडी मारली.उमरेड विधानसभा मतदारसंघातील कुही आणि भिवापूर तर हिंगणा मतदारसंघातील हिंगणा नगर पंचायतची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. त्यासाठी स्थानिक नेत्यांसह दिग्गज नेत्यांनी निवडणूक प्रचारात रंगत आणली. विशेष म्हणजे, मतदानाची टक्केवारी वाढल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांना निकालाबाबत धाकधूक होती. निकाल जाहीर होताच काहींसाठी तो धक्का तर काहींना दिलासा देणारा ठरला. कुही नगर पंचायतमध्ये सर्वाधिक आठ जागा काँग्रेसच्या ताब्यात गेल्या. त्याखालोखाल पाच जागा भाजपकडे गेल्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात प्रत्येकी एक जागा आली. अपक्षांनी दोन जागांवर विजय मिळविला. कुहीत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला एका सदस्याची गरज असून तेथे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा आहे. आ. राजेंद्र मुळक यांनी निवडणूक काळात विशेषत्वाने लक्ष दिल्याने तेथे काँग्रेसला यश मिळाले, हे विशेष! 

शेकापने राखली जागाकाटोल नगर परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक नानाजी वंजारी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत ती जागा पुन्हा शेतकरी कामगार पक्षाने प्राप्त केली. तेथून त्यांचे पुत्र संदीप वंजारी हे विजयी झाले. विजयानंतर नगराध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वात विजयी मिरवणूक काढण्यात आली.