शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण विरोधात भाजपचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

कुही/कोराडी/कामठी/सावनेर/कळमेश्वर/उमरेड/भिवापूर : लॉकडाऊन काळात बिल भरले नाही म्हणून महावितरणने राज्यातील ७५ लाख वीजग्राहकांना वीज कनेक्शन कापण्यासाठी नोटीस बजावल्या ...

कुही/कोराडी/कामठी/सावनेर/कळमेश्वर/उमरेड/भिवापूर : लॉकडाऊन काळात बिल भरले नाही म्हणून महावितरणने राज्यातील ७५ लाख वीजग्राहकांना वीज कनेक्शन कापण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील सामान्य ग्राहकांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी करीत भाजपच्या वतीने शुक्रवारी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात २५ ठिकाणी वीज केंद्रासमोर करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात वीजबिलाची होळी करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यासोबतच महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. कोराडी येथे महावितरणच्या कार्यालयाला भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाळे ठोकले. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश रंगारी, अनिल निधान, किशोर बेले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कुही येथे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात डॉ. शिवाजी सोनसरे, सुनील जुवार, भोजराज ठवकर,आस्तिक पाटील सहारे, गयानीवंत साखरवाडे, संदीप सुखदेवे आदी उपस्थित होते. उमरेड येथे माजी आमदार सुधीर पारवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भदोरीया, मंडळ अध्यक्ष दिलीप सोनटक्के, डॉ.मुकेश मुदगल आदी सहभागी झाले होते. भिवापूर येथे आनंदराव राऊत, भास्कर येंगळे, सुधाकर बोरकुटे, आनंद गुप्ता आदी नेत्यांसह २००पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. नरखेड येथील महावितरण कार्यालयासमोर जिल्हा उपाध्यक्ष उकेश चव्हाण, मंडळ अध्यक्ष सुनील कोरडे, मनोज कोरडे, श्यामराव बारई, सुरेश खसारे, इस्माईल बारुतवाले, संजय कामडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. काटोल येथील वीज मंडळ कार्यालयासमोर भाजप नेते चरणसिंग ठाकूर, किशोर रेवतकर, संदीप सरोदे, वैशाली ठाकूर, दिलीप ठाकरे, योगेश चाफले, विजय महाजन आदी सहभागी झाले होते. कळमेश्वर येथे प्रदेश भाजप सदस्य डॉ. राजीव पोतदार, रमेश मानकर, इमेश्वर यावलकर, प्रकाश टेकाडे, मीना तायवाडे, राजेश जीवतोडे, दिलीप धोटे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. सावनेर येथील आंदोलनात अशोक धोटे, संजय टेकाडे, सोनबा मुसळे, नितीन राठी, दादाराव मंगळे, विजय देशमुख, रामराव मोवाडे सहभागी झाले होते. हिंगणा, वाडी येथील आंदोलनात आमदार समीर मेघे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष संध्या गोतमारे, अंबादासजी उके, युवा मोर्चा अध्यक्ष आदर्श पटले, धनराज आष्टणकर आदी सहभागी झाले होते. बुटीबोरी येथे नगराध्यक्ष बबलू गौतम,आकाश वानखेडे यांच्या नेतृत्वात यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कामठी येथील आंदोलनात संजय कनोजीया, मनीष वाजपेयी, विवेक मंगतानी, राजेश खंडेलवाल आदी सहभागी झाले होते.