शहरं
Join us  
Trending Stories
1
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
2
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
5
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
6
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
7
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
8
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
9
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
10
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
11
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
12
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
13
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
14
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
15
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
16
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
17
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
18
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
19
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
20
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला हवा 'सबका साथ'

By admin | Updated: January 5, 2017 21:29 IST

आगामी महानगरपालिका निवडणुकांत मिशन-१२५ अंतर्गत भाजपाची प्रचारयंत्रणा कामाला लागली आहे.

 योगेश पांडे/ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 5 - आगामी महानगरपालिका निवडणुकांत  मिशन-१२५ अंतर्गत भाजपाची प्रचारयंत्रणा कामाला लागली आहे. मात्र केवळ परंपरागत व तरुण मतदारांवर भिस्त ठेवली तर हे लक्ष्य गाठता येणार नसल्याची पक्ष पदाधिकाऱ्यांना जाणीव आहे. त्यामुळेच  सबका साथ  भूमिका पक्षाने घेतली असून,  दलित व अल्पसंख्यक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यातूनच दलित चळवळीतील पक्ष तसेच अल्पसंख्यकांपर्यंत पक्षाचे धोरण पोहोचविण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.संघभूमी व विधानसभा निवडणुकांतील यशानंतर मनपा निवडणुकांत मोठा विजय मिळविण्याचे पक्षासमोर आव्हान आहे. निवडणुकांसाठी भाजपाच्या संचालन समितीची बुधवारी घोषणा करण्यात आली. आमदार, खासदारांचा समावेश असलेल्या या  टीमचे नेतृत्व आ.अनिल सोले यांच्याकडे देण्यात आले आहे. उत्तर, मध्य, दक्षिण नागपुरातील बऱ्याच प्रभागांमध्ये दलित व अल्पसंख्यक समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे.  व्होटबँकेच्या राजकारणात या दोघांचेही महत्त्व मोठे आहे. आपले  टार्गेट गाठायचे असेल तर पक्षाच्या परंपरागत मतदारांसोबतच नवीन मतदार जोडणे आवश्यक आहे. यासंदर्भात पक्ष पदाधिकाऱ्यांचे सखोल मंथन झाले. यातूनच आंबेडकरी विचारपक्ष संपर्क तसेच अल्पसंख्यक संपर्क या दोन्ही मुद्यांसाठी स्वतंत्र  टीम च तयार करण्यात आली. आंबेडकरी विचारपक्ष संपर्क समितीची जबाबदारी निवडणूक संचालन समितीचे प्रमुख आ.अनिल सोले यांनी स्वत:कडे ठेवली आहे. त्यांच्यासोबत आ.मिलिंद माने, महापौर प्रवीण दटके व संदीप जाधव यांचा समावेश आहे. तर अल्पसंख्यक संपर्क समितीत पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्रीकांत देशपांडे, भोजराज डुंबे, जमाल सिद्दीकी, फिरोज शेख यांचा समावेश आहे.या समितीच्या माध्यमातून दलित चळवळीतील विविध पक्ष तसेच अल्पसंख्यक पक्ष व संघटनांना भाजपासोबत जोडण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय निवडणूक काळात संबंधितांशी समन्वय राखण्याची जबाबदारी या समितीवर राहणार आहे. यादृष्टीने मागील अनेक दिवसांपासून विविध कार्यक्रमदेखील राबविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.