शस्त्राच्या धाकावर दुचाकीचालकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST2021-09-12T04:12:36+5:302021-09-12T04:12:36+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : पुतणीच्या घरी जेवण करण्यासाठी जात असलेल्या दुचाकीचालकास वाटेत अडविले व शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून ...

The biker was robbed at gunpoint | शस्त्राच्या धाकावर दुचाकीचालकास लुटले

शस्त्राच्या धाकावर दुचाकीचालकास लुटले

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : पुतणीच्या घरी जेवण करण्यासाठी जात असलेल्या दुचाकीचालकास वाटेत अडविले व शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून सहा हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावून घेतला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर परिसरात नुकतीच घडली. या प्रकरणात पाेलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे.

रमेश मंगूजी दापूरकर (६१, रा. वेकाेलि वसाहत, चनकापूर, ता. सावनेर) हे एमएच-४०/बीएस-७०२० क्रमांकाच्या माेटरसायकलने त्यांच्या पुतणीकडे दहेगाव (रंगारी), ता.सावनेर येथे जेवण करायला जात हाेते. अनिल शिवशंकर वर्मा (१९) व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने त्यांना वाटेत अडविले व त्यांच्यावर तलवार राेखून त्यांच्याकडून पाच हजार रुपये राेख व एक हजार रुपयांचा माेबाईल फाेन हिसकावून घेत दाेघांनीही पळ काढला.

याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी रमेश दापूरकर यांच्या तक्रारीवरून भादंवि ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असून, आराेपी अनिल वर्माचा शाेध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक धाेपाडे यांनी दिली.

Web Title: The biker was robbed at gunpoint