हनीट्रॅप प्रकरणाचे मोठे जाळे ! महिला यूट्यूबरलाही अटक; पत्रकारासह आतापर्यंत नऊ जण जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:27 IST2025-12-25T13:24:25+5:302025-12-25T13:27:40+5:30

Nagpur : ज्येष्ठ डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये फसवून दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक केल्यावर पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे.

Big web of honeytrap case! Female YouTuber also arrested; Nine people including journalist arrested so far | हनीट्रॅप प्रकरणाचे मोठे जाळे ! महिला यूट्यूबरलाही अटक; पत्रकारासह आतापर्यंत नऊ जण जेरबंद

Big web of honeytrap case! Female YouTuber also arrested; Nine people including journalist arrested so far

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
ज्येष्ठ डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये फसवून दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक केल्यावर पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका महिला यूट्यूबरला अटक केली आहे. या प्रकरणात तथाकथित पत्रकार रविकांत कांबळे याच्यासह आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

किरण मेश्राम असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तथाकथित पत्रकार रविकांत कांबळे, अश्विन विनोद धनविजय (३९, चंद्रमणीनगर, जयभीम को-ऑपरेटिव्ह सोसायटी, अजनी), नितीन सुखदेव कांबळे (३८, चंद्रमणीनगर, महाथेरा चंद्रमणी बौद्ध विहाराजवळ, अजनी), कुणाल प्रकाश पुरी (४२, चंद्रनगर, जुन्या कॉर्पोरेशन शाळेजवळ, अजनी), रितेश उर्फ पप्पू मनोहर दुरुगकर (४१, मनीषनगर, बेलतरोडी), आशिष मधुकर कातडे (३६, गोंदिया), आशिष हेमराज साखरे (३५, गोंदिया) यांना पोलिसांनी सुरुवातीला अटक केली होती. या आरोपींनी हनीट्रॅपिंगचे जाळे रचले होते. महिलांच्या माध्यमातून ते सावज हेरायचे आणि संबंधित व्यक्तीला एकट्यात बोलवायचे. तेथे महिलांसोबतचे त्याचे खासगी चित्रीकरण करून ते सार्वजनिक करण्याची धमकी द्यायचे. त्यांनी एका ६२ वर्षांच्या ज्येष्ठ डॉक्टरला जाळ्यात ओढले. एका महिलेसोबतचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी त्यांना दोन कोटींची खंडणी मागितली होती. 

पोलिसांनी आरुषी भालधरे नावाच्या महिलेलाही अटक केली होती. चौकशीच्या दरम्यान किरण मेश्रामचे नाव समोर आले. ती फरार होती. मात्र, तिला बुधवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण तेरा आरोपींची नावे आहेत. मात्र, काही जणांनी पडद्यामागूनही आरोपींना सहकार्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

तथाकथित पत्रकाराच्या मित्रांची चौकशी का नाही?

तथाकथित पत्रकार रविकांत कांबळे याला गडचिरोलीतही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र, जामिनावर सुटल्यावर त्यानंतर तो राजरोसपणे पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घ्यायचा. अगदी हिवाळी अधिवेशनातही तो विधिमंडळ परिसरात फिरताना दिसून आला. त्याच्यासोबत नागपुरातील काही तथाकथित पत्रकारही दिसून यायचे. त्याच्या निकटवर्तीय मित्रांची चौकशी केल्यास आणखी 'लिंक' समोर येऊ शकतात, परंतु कुणाच्या दबावाखाली ही चौकशी टाळण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


 

Web Title : हनीट्रैप मामले का जाल फैला: यूट्यूबर गिरफ्तार, नौ पत्रकार जेल में

Web Summary : नागपुर पुलिस ने हनीट्रैप रैकेट का भंडाफोड़ किया, एक महिला यूट्यूबर और एक पत्रकार सहित आठ अन्य को गिरफ्तार किया। उन्होंने एक डॉक्टर को समझौता करने वाले वीडियो जारी करने की धमकी देकर ₹2 करोड़ के लिए ब्लैकमेल किया। संभावित साथियों और पत्रकार के संबंधों की जांच जारी है।

Web Title : Honeytrap case widens: YouTuber arrested, nine journalists jailed.

Web Summary : Nagpur police busted a honeytrap racket, arresting a female YouTuber and eight others, including a journalist. They blackmailed a doctor for ₹2 crore, threatening to release compromising videos. Investigations continue into potential accomplices and the journalist's connections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.