शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

भीम माझा सूर्याची सावली!

By admin | Updated: October 3, 2014 02:47 IST

होता अंधार युगाचा, आमच्या पावलोपावली... धम्माच्या क्षितिजावर भीम झाला सूर्याची सावली...

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक प्रमुख व सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू दादा.जे.पी.वासवानी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. लोकसभा निवडणुकांमध्ये संघाने पार पाडलेली सक्रिय भूमिका व त्यानंतर भाजपाला मिळालेले एकहाती यश यामुळे यंदाच्या विजयादशमी उत्सवादरम्यान सरसंघचालक काय संदेश देतात याकडे स्वयंसेवकांसोबतच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दादा वासवानी यांचे भक्त जगभरात पसरलेले आहेत. ९६ वर्षाच्या वयात दादा वासवानी सामाजिक कार्यात अजूनही सक्रिय आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे ते प्रत्यक्ष जरी या कार्यक्रमात उपस्थित राहणार नसले तरी त्यांच्या आशीर्वचनांचे वाचन करण्यात येईल असे संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विजयदशमी उत्सवाअगोदर स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार आहे, अशी माहिती महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता व महानगर सहसंघचालक लक्ष्मणराव पार्डीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)स्वयंसेवकांमध्ये उत्साहदेशात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या विजयादशमी उत्सवासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जास्तीत जास्त नागरिक यावेळी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजनाचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेरूनदेखील स्वयंसेवक येणार आहेत.पथसंचलनाचा मार्गरेशीमबाग चौक येथून सकाळी ६.१५ वाजता पथसंचलनाला सुरुवात होईल. सी.पी.अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालयापासून पथसंचलन दोन पथकांत विभागले जाईल. पहिले पथक भुतिया दरवाजा चौक, दसरा रोड, राहतेकर वाडी, नागनदी पूल मार्गे रेशीमबाग चौक येथे पोहोचेल तर दुसरे पथक सोनबाची वाडी चौक, नागनदी पूल, जामदार हायस्कूल मार्गे रेशीमबाग चौक येथे पोहोचेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या सोहळ्याचे ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. व्हीएसके नागपूर. ओआरजी’ या संकेतस्थळावर ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे.