शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातून भारती, मोझम्मील ‘टॉप’

By admin | Updated: May 20, 2014 01:05 IST

सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये नागपुरातील सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलचा मोझम्मील खलील

 ‘सीबीएसई’ दहावी निकाल : निकालाची टक्केवारी वाढली

नागपूर : ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये नागपुरातील सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलचा मोझम्मील खलील तसेच गोंदिया येथील साकेत पब्लिक स्कूलच्या भारती बजाज या विद्यार्थिनीने विदर्भात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. दोघांनाही ९९ टक्के गुण ( १० सीजीपीए) मिळाले आहेत. सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलच्याच कोमल कुशवाहा या विद्यार्थिनीने ९८.४ टक्के गुणांसह दुसरे स्थान पटकाविले आहे. सीबीएसईच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र असून, निकालाची टक्केवारीदेखील वाढल्याचा दावा शाळांकडून करण्यात आला आहे. नागपुरातील भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स येथील सौंदर्या जनार्दन व नारायणम् विद्यालयाच्या जिज्ञासा बडवाईक या विद्यार्थिंनींनी संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकाविला आहे. या दोघींनाही ९८.२ टक्के गुण आहेत.दहावीचा निकाल सोमवारी संध्याकाळी उशिरा लागला. अचानक जाहीर झालेल्या या निकालामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालक व शाळा प्रशासनाची धावपळ झाली. ‘आॅनलाईन’ निकालात केवळ ‘सीपीजीए’ दिसत असल्यामुळे नेमके गुण जाणून घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये धाव घेतली. शाळांतील शिक्षक व कर्मचार्‍यांनीदेखील रात्री उशिरापर्यंत थांबून संपूर्ण निकाल ‘डाऊनलोड’ करून घेतला, हे विशेष.