मनसेतर्फे डॉ. मोईनुद्दीन ख्वाजा यांचा सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:07 IST2021-07-02T04:07:06+5:302021-07-02T04:07:06+5:30

मनसेच्या वतीने ‘जागतिक डॉक्टर्स डे’निमित्त महाल भागातील महापालिकेच्या स्व. प्रभाकरराव दटके स्मृती रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात नागपुरातील ...

On behalf of MNS, Dr. Moinuddin Khwaja felicitated () | मनसेतर्फे डॉ. मोईनुद्दीन ख्वाजा यांचा सत्कार ()

मनसेतर्फे डॉ. मोईनुद्दीन ख्वाजा यांचा सत्कार ()

मनसेच्या वतीने ‘जागतिक डॉक्टर्स डे’निमित्त महाल भागातील महापालिकेच्या स्व. प्रभाकरराव दटके स्मृती रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात नागपुरातील मुस्लिमबहुल भागात महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगली कामगिरी बजावणारे डॉ. मोईनुद्दीन ख्वाजा यांचा मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी हेमंत गडकरी म्हणाले, कोरोनाच्या काळात डॉ. ख्वाजा यांच्यासारख्या डॉक्टरांनी मनोभावे जनतेला आरोग्यसेवा दिल्यामुळे नागपुरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. ते आणि त्यांचे सहकारी खऱ्या अर्थाने देवदूत असून, त्यांचा सत्कार करताना मनापासून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन प्रशांत निकम यांनी केले. प्रास्ताविक संजय भोसले यांनी केले. कार्यक्रमाला वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक सचिन धोटे, मध्य नागपूरचे अरविंद सावरकर, राजाभाऊ पत्राळे, धीरज ऊर्फ अण्णा गजभिये, गोकुळ वरेकर, गणेश मुदलियार, सतीश काणे, महापालिकेचे सोहेल अली, धनराज मेढेकर, शकील, संजय सातपुते, सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

.................

Web Title: On behalf of MNS, Dr. Moinuddin Khwaja felicitated ()