बीएड सीईटी परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे स्थगित ! दुपारच्या सत्राची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये संताप

By आनंद डेकाटे | Updated: March 27, 2026 20:21 IST2026-03-27T20:20:03+5:302026-03-27T20:21:47+5:30

Nagpur : बीएड सीईटी परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात शुक्रवारी मोठा तांत्रिक बिघाड उघड झाला. डोंगरगाव येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट केंद्रावर दुपारी ३ वाजता सुरू होणारा पेपर सायंकाळपर्यंत सुरू होऊ शकला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

B.Ed CET exam postponed due to technical glitch! Afternoon session exam postponed, students angry | बीएड सीईटी परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे स्थगित ! दुपारच्या सत्राची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये संताप

B.Ed CET exam postponed due to technical glitch! Afternoon session exam postponed, students angry

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
बीएड सीईटी परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात शुक्रवारी मोठा तांत्रिक बिघाड उघड झाला. डोंगरगाव येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट केंद्रावर दुपारी ३ वाजता सुरू होणारा पेपर सायंकाळपर्यंत सुरू होऊ शकला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

परीक्षेसाठी वेळेवर पोहोचलेल्या उमेदवारांना लॅबमध्ये बसवण्यात आले, मात्र संगणक प्रणाली वारंवार निकामी होत राहिली. अनेक संगणक सुरूच झाले नाहीत, तर काहींमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नव्हती. अनेक विद्यार्थ्यांना लॉगिन करण्यात अडचणी आल्या, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे विद्यार्थी संतापले. माहितीनुसार, एमएच सीईटी परीक्षेचे संचालन असेसइन्फ्रा कंपनीकडे असून त्यांनी सॉफ्टवेअर आणि परीक्षा व्यवस्थापनाचे काम एडुस्पार्ककडे सोपवले आहे. सर्व्हर संचालनही एडुस्पार्ककडूनच केले जाते. प्राथमिक तपासात असे समोर आले की परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे अर्धा तास आधी सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे संपूर्ण प्रणाली क्रॅश झाली.

महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की केंद्रावर संगणक व बसण्याची सर्व व्यवस्था आधीच तयार होती. एडुस्पार्कच्या अभियंत्यांनीही परीक्षेपूर्वी प्रणालीची तपासणी केली होती. तरीही ऐनवेळी सर्व्हर निकामी झाल्याने संपूर्ण परीक्षा विस्कळीत झाली. तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणांवर कारवाईची मागणी केली. घोषणा देत नारेबाजी केली. अनेक उमेदवारांनी हा त्यांच्या भवितव्याशी केलेला खेळ असल्याचे म्हटले.

२८ किंवा २९ मार्चला परीक्षा होणार

दरम्यान, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र यांनी अधिकृतरीत्या दुपारच्या सत्राची परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. जारी पत्रात नमूद करण्यात आले आहे की २७ मार्च 2026 रोजीची परीक्षा तांत्रिक कारणांमुळे होऊ शकली नाही. आता ही परीक्षा २८ किंवा २९ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना नवीन तारखेची व सुधारित प्रवेशपत्राची माहिती ईमेल व एसएमएसद्वारे लवकरच देण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे तक्रार

दरम्यान बसपाचे शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी भेट घेतली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे यासंबंधित तक्रार करीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

Web Title : तकनीकी खराबी के कारण बी.एड सीईटी परीक्षा स्थगित; छात्र नाराज

Web Summary : तकनीकी गड़बड़ी के कारण बी.एड सीईटी परीक्षा स्थगित कर दी गई, जिससे दोपहर का सत्र रद्द हो गया। डोंगरगांव केंद्र पर छात्रों ने सर्वर की समस्याओं का विरोध किया और कार्रवाई की मांग की। परीक्षा 28 या 29 मार्च को पुनर्निर्धारित की गई है, विवरण ईमेल किया जाएगा।

Web Title : B.Ed CET Exam Postponed Due to Technical Issues; Students Angered

Web Summary : A technical glitch disrupted the B.Ed CET exam, causing postponement of the afternoon session. Students at the Dongargaon center protested server issues, demanding action. The exam is rescheduled for March 28 or 29, with new details to be emailed.