मेडिकलमध्ये मारहाण

By Admin | Updated: November 3, 2015 03:16 IST2015-11-03T03:16:16+5:302015-11-03T03:16:16+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बंद रक्तपेढीचे प्रकरण तापले असताना याच विभागाच्या

Beating in medical | मेडिकलमध्ये मारहाण

मेडिकलमध्ये मारहाण

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बंद रक्तपेढीचे प्रकरण तापले असताना याच विभागाच्या विभागप्रमुखाला सोमवारी दुपारच्या सुमारास एका सुरक्षा रक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित विभागप्रमुखाने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मेडिकलमधील रक्तपेढीच्या त्रुटींवर बोट ठेवत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीएने) बुधवारपासून रक्तपेढीला केवळ रक्त पिशवी (होल ब्लड) देण्याची परवानगी दिली आहे. रक्त घटक (ब्लड कॉम्पोनंट) देण्याची परवानगी नाकारली आहे. परिणामी, अनेक रुग्णांना या सर्व बाबी समजवून सांगून उपलब्ध रक्ताची माहिती देताना रक्तपेढीच्या डॉक्टरांची दमछाक होत आहे. यात या मारहाणीचा प्रकार घडल्याने डॉक्टरांसह येथील तंत्रज्ञांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Beating in medical