बावनकुळेंचे वडेट्टीवारांना ओपन चॅलेंज ! 'खरात प्रकरणात कुटुंबाला ओढू नका, पुरावे द्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:23 IST2026-03-30T14:22:29+5:302026-03-30T14:23:24+5:30
Nagpur : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेत त्यांना थेट आव्हान दिले.

Bawankule's open challenge to Vadettiwar! 'Don't drag the family into the Kharat case, give evidence'
नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेत त्यांना थेट आव्हान दिले.
महसूल भ्रष्टाचार आणि वडेट्टीवारांना चॅलेंज
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसमोर भोंगा वाजवून काहीही साध्य होणार नाही. जर त्यांच्याकडे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे खरोखरच पुरावे असतील, तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांकडे किंवा माझ्याकडे आज सायंकाळपर्यंत द्यावेत. कोणत्याही अधिकाऱ्याचा यात सहभाग असेल तर सरकार त्यावर कठोर कारवाई करेल, असे बावनकुळे म्हणाले. खरात प्रकरण हे संवेदनशील असून कोणाच्याही कुटुंबावर संशय निर्माण करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे योग्य नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
खत टंचाईच्या केवळ अफवा
शेतकऱ्यांमध्ये खतांच्या किमती वाढण्याबाबत पसरविल्या जात असलेल्या माहितीवर स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले की, खतांच्या किमती वाढणार नाहीत, या केवळ सोशल मीडियावरील अफवा आहेत. पेट्रोल, डिझेल आणि खतांबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. कोणत्याही दुकानदाराने खतांची साठेबाजी केली, तर सरकार त्यांना सोडणार नाही.
महसूल कायद्यात मोठे बदल
पुढील तीन वर्षांत सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात चकरा मारण्याची वेळ येऊ नये, अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही तयार करत आहोत. दीड हजार स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांच्या समस्या मार्गी लावणे आणि मोजणी प्रक्रिया सुलभ करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.