शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातून प्रथमच केळींची निर्यात

By admin | Updated: February 13, 2016 02:35 IST

शेतमालाच्या उत्पादन क्षमता आणि दर्जा वाढवून निर्यातीकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी उपलब्ध होईल, याकडे आता शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असून...

नागपूर बनावे शेतीमालाच्या निर्यातीचे उत्तम केंद्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर : शेतमालाच्या उत्पादन क्षमता आणि दर्जा वाढवून निर्यातीकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी उपलब्ध होईल, याकडे आता शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असून भविष्यात नागपूर हे विदर्भातून शेतमालाच्या निर्यातीचे उत्तम केंद्र बनावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अ‍ॅग्रोव्हिजन, महाआॅरेंज आणि मर्चेन्डाईज व्हेंचर्स यांनी विदर्भातून प्रथमच केळीचे कंटेनर शुकवारी इराणमध्ये निर्यात केले. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित शुभांरभा प्रसंगी ते बोलत होते. विदर्भातून प्रथमच केळी निर्यात होत असल्याचे समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेकडे लक्ष केंद्रित करून लागवडीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. मर्चेन्डाईज व्हेंचर्सचे गिरीश जैन यांनी याकरिता पुढाकार घेतला असून, हे पहिले कंटेनर निर्यात करताना अतिशय आनंद होत असल्याचे सांगितले. अ‍ॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे प्रशिक्षण या माध्यमातून केलेला इस्रायल दौरा यातूनच ही प्रेरणा मिळाली, असेही ते म्हणाले. महाआॅरेंजचे श्रीधरराव ठाकरे यांनी संत्रा निर्यातीनंतर विदर्भातून केळी निर्यात करण्याचा हा प्रयत्न शेतकऱ्यांना भविष्याकरिता भरभराटीची चाहुल देणारा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अ‍ॅग्रोव्हिजनचे रवी बोरटकर यांनी यावेळी सांगितले की, नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात अ‍ॅग्रोव्हिजन सतत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहे. आता निर्यातीच्या क्षेत्रात शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा, प्रशिक्षित व्हावा, यासाठी भविष्यात त्या धर्तीवर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी महाआॅरेंजचे श्रीधर ठाकरे, राहुल ठाकरे, अ‍ॅग्रोव्हिजनचे सचिव रवी बोरटकर, एमव्हीचे संचालक गिरीश जैन, पूर्तीचे जनसंपर्क अधिकारी नितीन कुळकर्णी, मर्चेन्डाईज व्हेंचर्सचे सीईओ धर्मेंद्र शर्मा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)