शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ बहुजनांचा एल्गार

By admin | Updated: January 15, 2017 02:13 IST

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करण्यात यावी,

बहुजन क्रांती मोर्चा : दलित, ओबीसी, आदिवासी, मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजबांधवांचा सहभाग नागपूर : अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करण्यात यावी, भटके विमुक्तांनाही अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत संरक्षण देण्यात यावे, आदी विविध मागण्यासांठी शनिवारी नागपुरात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बौद्ध, दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी आदी समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रेशीमबाग चौक येथून निघालेला हा मोर्चा अशोक चौक, बैद्यनाथ चौक, सीताबर्डी, व्हेरायटी चौकमार्गे संविधान चौक येथे पोहोचला. संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एका शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चा सुरू होण्यापूर्वी रेशीमबाग मैदान येथे जाहीर सभा पार पडली. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे अध्यक्षस्थानी होते. या सभेला भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मार्गदर्शन करीत राज्य सरकारवर चौफेर टीका केली. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट शिथिल करण्याचे षड्यंत्र सरकार रचत आहे. परंतु या कायद्यातील एक ऊकार किंवा स्वल्पविराम सुद्धा कमी केला तर सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मराठा व ओबीसी आणि दलित बांधवांमध्ये सरकार भांडण लावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी भदंत सुरेई ससाई, रवी शेंडे, नारायण बागडे, अर्चना भोयर, श्रीधर साळवे, सुनील पेंदारे, प्रा. रमेश पिसे, मंगेश गेडाम, रेव्हरंड, गायकवाड, इमाम मसुद, मौलाना हफीज असरफ आदींनीही मार्गदर्शन केले. मोर्चात भीमराव फुसे, देवेंद्र घरडे, अमोल वाकुडकर, वंदना बेंजामिन, स्मिता कांबळे, बबिता मेहर, यशवंत मेश्राम, आकाश दुपारे, प्रवीण कांबळे, नागोराव धोंडे, अविनाश निमकर, डॉ. प्रफुल्ल मेश्राम, सुषमा भड, अरुण गाडे आदींसह जवळपास ४६८ संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.(प्रतिनिधी) बहुजन क्रांती मोर्चा जनआंदोलनाचे रूप घेणार बहुजन क्रांती मोर्चा हा विविध समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेले एक व्यासपीठ असून त्याला जनआंदोलनाचे रूप देण्यात येणार आहे, अशी माहिती बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. येत्या २१ तारखेला मुंबईत याचा समारोप होईल. त्यानंतर राज्यातील प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जातील. यानंतर देशातील ३१ राज्यांमध्ये आणि जवळपास ५०० जिल्ह्यांमध्ये मोर्चा काढण्यात येईल. या माध्यमातून जवळपास सहा लाख गावांपर्यंत पाहोचण्याचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक गावात या मोर्चाची एक शाखा तयार केली जाईल. जोपर्यंत आमच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असेही वामन मेश्राम यांनी स्पष्ट केले.