शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

१०० एकरावर ‘आयुर्वेद प्रकल्प’!

By admin | Updated: August 10, 2015 02:33 IST

सर्वाधिक जंगलयुक्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जंगलात उपलब्ध विविध वनस्पतींवर प्रक्रिया करून आयुर्वेद औषधांची निर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी ...

शासकीय आयुर्वेद रुग्णालयाचा पुढाकार : जंगलातील विविध वनस्पतींवर होणार प्रक्रियानागपूर : सर्वाधिक जंगलयुक्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जंगलात उपलब्ध विविध वनस्पतींवर प्रक्रिया करून आयुर्वेद औषधांची निर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासकीय आयुर्वेद रुग्णालयाने सादर केला आहे. १०० एकर जागेवर प्रस्तावित या प्रकल्पामुळे गडचिरोलीतील आदिवासी बांधवांना रोजगार मिळेल. शासनाने या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न चालविले आहे. लोकमत शुभवर्तमानगडचिरोली हा जिल्हा आदिवासीबहुल व जंगलयुक्त आहे. जिल्ह्यातील ९० टक्के आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह हा जंगलावरच चालतो. वनस्पती गोळा करून आदिवासी त्या विकतात. काही खासगी कंपन्या आदिवासी बांधवांकडून या बहुगुणी वनस्पती फार कमी किमतीत खरेदी करतात व त्याच वनस्पतीवर प्रक्रिया करून १०० पट महाग विकतात. आयुर्वेदाचे महत्त्व वाढविण्यासाठी नागपुरातील आयुर्वेद रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार प्रयत्न करीत आहे. यातूनच हा ‘आयुर्वेद प्रकल्प’चा प्रस्ताव सामोर आला. या संदर्भात डॉ. मुक्कावार यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकल्पामुळे रुग्णांना होणारी मदत, आदिवासींना मिळणारा रोजगार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वनस्पतीवरील संशोधनात येणारी गती याचे महत्त्व मांडले. अनुपकुमार यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत गडचिरोलीत आयुर्वेद प्रकल्पाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या संभावित प्रकल्पाची माहितीही दिली आहे. लवकरच अनुपकुमार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.बहुगुणी वनस्पतींचा उपयोग होईलजंगलातील बहुसंख्य व बहुगुणी वनस्पतींचा उपयोग होताना दिसत नाही. या प्रकल्पामुळे अनेक नव्या किंवा काळाच्या पडद्याआड गेलेल्या वनस्पती समोर येण्याची शक्यता आहे. या वनस्पतींवर प्रक्रिया करून, साठवण, उत्पादन व पुरवठाही केला जाईल. प्रकल्पातील औषधी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही पुरविली जाईल. शिल्लक औषधी खासगी कंपन्यांनाही विकत दिली जाईल. यामुळे आयुर्वेद औषधी सर्वसामान्यांना उपलब्ध होईलच आणि शासनाचा ‘रेव्हेन्यू’सुद्धा वाढेल.