शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

औषधांसाठी तासन्तास प्रतीक्षा

By admin | Updated: September 7, 2016 02:44 IST

ब्रिटिशांच्या काळातील मेयो रुग्णालय आज सुधारत असले तरी स्थिती वाईटच आहे. येथे औषधांच्या वितरणासाठी केवळ दोनच खिडक्या आहेत.

मेयो रुग्णालयात रुग्णांना फटका : दोनच खिडक्यातून होते वाटपनागपूर : ब्रिटिशांच्या काळातील मेयो रुग्णालय आज सुधारत असले तरी स्थिती वाईटच आहे. येथे औषधांच्या वितरणासाठी केवळ दोनच खिडक्या आहेत. परिणामी, खिडक्यांवर रुग्णांची गर्दी उसळते. रुग्णांना दुखणे सहन करीत एक ते दीड तास उभे राहावे लागते. त्यातही लिहून दिलेले औषध मिळेल का ही शंका असते.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विखुरलेल्या इमारतीमुळे रुग्णसेवेत सुलभता व गुणात्मकता बाधित होत आहे. असे असताना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. या रुग्णालयात विदर्भच नाहीतर आजूबाजूच्या पाच राज्यांमधून रुग्ण येतात. येथील अपघात विभाग गेल्या वर्षी रुग्णसेवेतून कमी झाला आहे. त्याची जागा आता नव्या अपघात विभागाने घेतली आहे. या विभागाला बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) जोडण्यात आला आहे. ओपीडीमध्ये रोज दीड हजारावर रुग्ण येतात. यातील बहुसंख्य रुग्ण हे दारिद्र्यरेषेखालील असतात. येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी आहे. शासनाच्या नियमानुसार या दोन्ही प्रकारातील रुग्णांना नि:शुल्क औषधे देण्याचा नियम आहे. परंतु रुग्णांच्या पदरी मोजकीच औषधे पडतात. इतर औषधांसाठी रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जातो. रुग्णालयात १३ क्रमांकाच्या खिडकीतून औषधांचे वितरण केले जाते. मात्र येथे दोनच खिडक्या आहेत. यामुळे गर्दी वाढते. येथे रुग्णांना बसायला खुर्च्या किंवा टेबल नाहीत. दुखणे सहन करीत रांगेत उभे रहावे लागते. (प्रतिनिधी)