रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांनी केली प्रवाशांची लूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 09:22 PM2020-07-25T21:22:25+5:302020-07-25T21:27:31+5:30

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑटो बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. परंतु तरीसुद्धा रेल्वेस्थानकावर काही ऑटोचालक सक्रिय होते. त्यांनी रेल्वेस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांकडून चौपट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली.

Autorikshaw driver rob passengers at railway station! | रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांनी केली प्रवाशांची लूट!

रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांनी केली प्रवाशांची लूट!

Next
ठळक मुद्देआकारले चौपट भाडे : अनेक प्रवासी पायीच गेले घरी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑटो बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. परंतु तरीसुद्धा रेल्वेस्थानकावर काही ऑटोचालक सक्रिय होते. त्यांनी रेल्वेस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांकडून चौपट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली.


नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी ११.०५ वाजता नवी दिल्ली-विशाखापट्टनम ही गाडी आली. या गाडीतून १५० प्रवासी उतरले. काही मोजक्या प्रवाशांचेच नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आले होते. उर्वरित प्रवाशांना शहरातील वेगवेगळ्या भागात जायचे होते. परंतु ऑटो बंद असल्यामुळे काही ऑटोचालकांनी आपले ऑटो रेल्वेस्थानकाच्या आजूबाजूला दुरवर उभे केले होते. रेल्वेस्थानकाच्या बाहेर उभ्या असलेल्या प्रवाशांशी ते पैशांसाठी वाटाघाटी करताना आढळले. डिप्टी सिग्नलला जाण्यासाठी ६०० रुपये, नंदनवनसाठी ५०० रुपये, केडीके कॉलेज ६०० रुपये, नरेंद्रनगर ४०० रुपये, मानेवाडा ५०० रुपये, सदर ३०० रुपये, मिनिमातानगर ५०० रुपये असे भाडे ऑटोचालक प्रवाशांना सांगत होते. सौदा पक्का झाल्यानंतर प्रवाशांना एका ठिकाणी उभे करून ते ऑटो घेऊन येत होते. अशाप्रकारे आॅटोचालकांनी प्रवाशांची लूट केली.

ऑटोचालकांनी आकारलेले भाडे
डिप्टी सिग्नल ६०० रुपये
सीताबर्डी १०० रुपये
नंदनवन ५०० रुपये
केडीके कॉलेज ६०० रुपये
नरेंद्रनगर ४०० रुपये
मानेवाडा ५०० रुपये
सदर ३०० रुपये
मिनिमातानगर ५०० रुपये

नाईलाजास्तव मोजले पैसे
रेल्वेस्थानकावर उतरलेल्या बहुतांश प्रवाशांजवळ दोन ते तीन बॅग होत्या. पायी जाणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव ऑटोचालकांनी सांगितलेले अव्वाच्या सव्वा भाडे देणे त्यांना भाग पडले. प्रवाशांच्या या मजबुरीचा फायदा ऑटोचालक घेत असल्याचे चित्र दिसले.

अनेकजण निघाले पायी
ऑटोचालकांनी सांगितलेले भाडे परवडणारे नसल्यामुळे अनेक प्रवाशांना ते देणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी पाठीवर एक बॅग आणि हातात ट्रॉलीबॅग घेऊन पायीच जाणे पसंत केले. अनेक प्रवाशांनी पायीच आपले घर जवळ केले.

Web Title: Autorikshaw driver rob passengers at railway station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.