शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून आॅटो बंद

By admin | Updated: September 15, 2014 01:04 IST

जोपर्यंत सर्व आॅटो मीटरचे कॅलिब्रेशन होत नाही तोपर्यंत आरटीओच्यावतीने आॅटोंवर होत असलेली कारवाई हुकूमशाही पद्धतीची आहे. या विरोधात १५ व १६ सप्टेंबरला आॅटो बंदचा इशारा तीन सीटर

काही संघटनांचा विरोध : बंदने चालकांचे अहित नागपूर : जोपर्यंत सर्व आॅटो मीटरचे कॅलिब्रेशन होत नाही तोपर्यंत आरटीओच्यावतीने आॅटोंवर होत असलेली कारवाई हुकूमशाही पद्धतीची आहे. या विरोधात १५ व १६ सप्टेंबरला आॅटो बंदचा इशारा तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने दिला आहे, परंतु या बंदला विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनसह काही आॅटो संघटनांनी विरोध दर्शविल्याने बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीचे महासचिव हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले, आरटीओ आणि वाहतूक पोलीस विभागांना फक्त आॅटोरिक्षाच दिसून येतात. काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करण्यात आली होती. मागील वर्षी आॅटोरिक्षांसाठी १६ वर्षांच्या मर्यादेचा निर्णय घेण्यात आला आणि आता आॅटो मीटरने चालविण्याची सक्ती केली जात आहे. दुसरीकडे अवैध वाहतूक सुरूच आहे. स्टार बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात आहे, याकडे कुणाचेच लक्ष नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, हा बंद आॅटोरिक्षा चालकांच्या हिताचा नाही. सध्या शहरात आॅटो मीटरने चालायला लागले आहेत. याचा फायदा चालकासोबतच प्रवाशांना होत आहे. अशा वेळी बंद पाळून अवैध वाहतुकीला सहकार्य करण्यासारखेच आहे. आॅटोचालकांनी यापासून दूर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी आॅटो युनियनचे महासचिव अल्ताफ अन्सारी यांनीही बंदला विरोध दर्शविला आहे. (प्रतिनिधी)सुटीच्या दिवशीही कारवाईचा धडकाविना मीटर धावणाऱ्या आॅटोरिक्षांवर आरटीओ शहरचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. १ सप्टेंबरपासून सुरू झालेली ही कारवाई सुटीच्या दिवशीही थांबलेली नाही. आज रविवार असतानाही १५ आॅटो जप्त करण्यात आले. आतापर्यंत ३८५ आॅटोरिक्षा जप्त करण्यात आले आहेत.