शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिकता हरवली

By admin | Updated: June 29, 2014 00:48 IST

आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वत:च्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले.

ताराचंद्र खांडेकर : मार्गदाता मासिकाचे चर्चासत्रनागपूर : आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वत:च्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले. ‘मार्गदाता’ मासिकातर्फे आज, शनिवारी हिंदी मोरभवनातील सभागृहात ‘आता आंबेडकरवाद्यांची यापुढची दिशा’ विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अन्य वक्त्यांमध्ये आंबेडकरी विचारवंत डॉ. विमल कीर्ती यांचा समावेश होता. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी होते. ‘मार्गदाता’चे संपादक दिलेश मेश्राम उपस्थित होते. खांडेकर यांनी रा.सू. गवई, कांशीराम, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, मायावती आदी आंबेडकरी नेत्यांचा नावासह उल्लेख करून त्यांच्या प्रामाणिकतेवर शंका उपस्थित केली. हे नेते आंबेडकर मानत असले तरी जगत नाहीत. आजच्या नेत्यांकडून आंबेडकरांच्या नावावर केवळ स्वत:चे घर भरले जात आहे. विविध गटांत विभागलेले आंबेडकरी नेते अपप्रवृत्ती असून ती कालसापेक्ष निर्माण होतच असते. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान मान्य असणाऱ्यांनी नेतृत्वाच्या पैदासीचे नियोजन करणे आवश्यक आहे. सामाजिक शक्ती निर्माण करणे आपले उत्तरदायित्व आहे. आजच्या पिढीपुढे अनेक नेते उभे आहेत. परंतु, त्यांची प्रामाणिकता संशयास्पद आहे. रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यावेळच्या नेत्यांनी निष्ठेने कार्य करून चळवळ मोठी केली. आजचे नेते दिशाभूल करतात. यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांना दिशा गवसली नाही, असे खांडेकर यांनी सांगितले.विमल कीर्ती म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा राजकारणात असलेला दबदबा परत आणण्यासाठी विभागलेल्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाकरिता राजकीय क्षेत्र काबीज करणे आवश्यक आहे. राजकीयदृष्ट्या शक्तीशाली झाल्याशिवाय आंबेडकरी जनतेच्या समस्या सुटणार नाहीत. आंबेडकरी चळवळीला खऱ्या नेतृत्वाची गरज आहे. व्यक्तिवादी नेतृत्वामुळे चळवळीचा घात झाला आहे. अनिल वासनिक, निरंजन वासनिक, के. जी. इंगळे, गुणवंत पाटील, विनायक ढोके, मधुकर बोरीकर आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)