शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया व राहुल गांधींच्या सभेकडे विदर्भवाद्यांचे लक्ष

By admin | Updated: April 4, 2016 05:47 IST

अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ११ एप्रिल रोजी नागपुरात कस्तुरचंद पार्कवर

नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ११ एप्रिल रोजी नागपुरात कस्तुरचंद पार्कवर सभा होत आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या सभेत काँग्रेस पक्षश्रेष्ठी काही सूतोवाच करतात काय याकडे विदर्भवाद्यांचे लक्ष लागले आहे. सोनिया व राहुल गांधी यांनी विदर्भाला समर्थन जाहीर करावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्याची तयारी विदर्भवाद्यांनी चालविली आहे.विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी सातत्याने विदर्भाच्या मागणीचे समर्थन केले आहे. मात्र, अ.भा. काँग्रेस समितीकडून या मागणीला कधीच पाठबळ मिळालेले नाही. या विषयाला नेहमीच बगल दिली. आता काँग्रेस नेते विदर्भासाठी भाजपकडे बोट दाखवित आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या श्रेष्ठींची विदर्भाबाबत काय भूमिका आहे हे त्यांनी विदर्भातील या सभेत स्पष्ट करावे, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे. तर ज्यांनी विदर्भाची स्वप्न दाखवून मते घेतली, सत्ता मिळवली. त्या भाजपा नेत्यांनी आता शब्द पाळावा. विदर्भ राज्य देण्याचा निर्णय घेणे हे केंद्रात सत्ता असलेल्यांच्या हाती आहे. भाजपने लोकसभेत वेगळ्या विदर्भ राज्याचा प्रस्ताव आणावा. काँग्रेस त्याला समर्थन देईल. त्यासाठी आम्ही पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना विनंती करू. समर्थन दिले नाही तर काँग्रेस तोंडघशी पडेल. विदर्भातील लोकांना सत्यस्थिती कळेल, अशी भूमिका घेत भाजपचे पाय भाजपच्याच गळ्यात बांधले आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री विलास मुत्तेमवार लोकमतशी बोलताना म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भासाठी आंदोलने सुरू आहेत. अ‍ॅड. श्रीहरी अणेंचे आंदोलन हे त्याचाच एक भाग आहे. काँग्रेस श्रेष्ठींचा विदर्भाला विरोध नाही. द्विग्विजयसिंग यांनीही विरोध केला नाही. त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर हा विषय सोपविला व विदर्भातील काँग्रेस नेते वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत. वेगळे राज्य देण्याचा निर्णय सत्तेत असणाऱ्यांनी घ्यायचा असतो. आता काँग्रेस सत्तेत नाही. काँग्रेस सत्तेत होती तेव्हा दिलेल्या आश्वासनानुसार तेलंगना राज्य दिले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांनी शब्द पाळावा. केवळ आंदोलनांनेच राज्य निर्माण होते असे नाही. लोकशाहीत मागणीची दखल घेतली जावी. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणाचा विकास पाहून आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे भाजपने आता निराशा न करता लेगच विदर्भ राज्याचा प्रस्ताव संसदेत मांडावा, अशी मागणी त्यांनी केली.(प्रतिनिधी)