शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारप्रकरणी आरोपी कर्मचारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:53 IST

मनोरुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने अनाथ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याची व्हिडिओ क्लिपिंगही बनवल्याचा

मनोरुग्णालयातील घटना : अल्पवयीन मुलीचे प्रकरण, व्हिडिओ क्लिपिंगही बनवलीलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनोरुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने अनाथ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याची व्हिडिओ क्लिपिंगही बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १४ जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणामुळे पोलीस आणि मनोरुग्णालयातील अधिकारी हादरले आहेत. लोकेश घनश्याम गंगाहेडे (३४) रा. न्यू वाल्मिकी कॉलनी इमामवाडा असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस सूत्रानुसार १२ ते १४ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी ही श्रद्धानंदपेठ अनाथालयात राहते. तिला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९ जुलै रोजी तिला सुटी मिळली होती. तेथून अनाथालयात परत आल्यानंतर २० जुलै रोजी अल्पवयीन मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. पोलीस सूत्रानुसार अल्पवयीन मुलीचे म्हणणे आहे की, १४ जुलै रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या दरम्यान तिच्यावर बाथरूममध्ये अत्याचार करण्यात आला. तसेच तिची व्हिडिओ क्लिपिंग बनवण्यात आली. काठीने तिला मारहाण करून याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. अल्पवयीन मुलीकडून अत्याचाराचे ऐकून अनाथालयातील अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. त्यानी महिला समुपदेशक समितीला तातडीने सूचना दिली. समितीतर्फे विचारपूस केली असता अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेला प्रसंग पुन्हा सांगितला. या आधारावर गुरुवारी सायंकाळी मानकापूर पोलिसांना सूचना देण्यात आली. मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच मानकापूर पोलीसही हादरून गेले. त्यांनी लगेच लोकेशला ताब्यात घेतले. त्याने अत्याचार केल्याचे नाकारले आहे. लोकेशचे म्हणणे आहे की, तो दुपारच्या वेळी आपल्या साथीदारांसह मेसमध्ये जेवण बनवण्यासाठी जातो. सर्व सोबतच ये-जा करतात. खुल्या परिसरात अशा प्रकारचे कृत्य होऊन कुणालाही माहीत न होणे शक्य नाही. लोकेशने अल्पवयीन मुलीने सांगितलेला मोबाईलसुद्धा आपल्याकडे नसल्याचे सांगितले आहे. लोकेशला विचारपूस केल्यावर पोलीसही चक्रावून गेले आहेत. तो दीड वर्षापूर्वीच कामावर लागला होता. तो रुग्णांना जेवण वाढण्याचे काम करतो.