शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

नागपुरात हल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 9:23 PM

मध्य भारतातील नामवंत उद्योजक आणि हल्दीरामचे मालक राजेंद्र अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच त्यांच्याकडून ५० लाखांची खंडणी वसुलण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपींना धंतोली पोलिसांनी अटक केली. आरोपींचा एक साथीदार फरार आहे. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर नागपुरातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देथोडक्यात बचावले५० लाखांच्या खंडणीची मागणीवारंवार शिवीगाळ, धमक्यापाच आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य भारतातील नामवंत उद्योजक आणि हल्दीरामचे मालक राजेंद्र अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच त्यांच्याकडून ५० लाखांची खंडणी वसुलण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपींना धंतोली पोलिसांनी अटक केली. आरोपींचा एक साथीदार फरार आहे. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर नागपुरातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.२८ एप्रिल २०१८ ला राजेंद्र अग्रवाल त्यांचा वाहनचालकासोबत शनी मंदिरात दर्शनाला आले होते. दर्शन आटोपल्यानंतर तेथील भाविकांना ते प्रसाद वाटत होते. गर्दी झाल्यामुळे त्यांनी प्रसाद वितरणाची जबाबदारी वाहनचालकावर सोपवली आणि ते वाहनात जाऊन बसले. अचानक चार ते पाच जण वाहनचालकासोबत झोंबाझोंबी करू लागले. वाहनचालक धष्टपुष्ट असल्याने त्याने त्या चार पाच जणांनाही हुसकावून लावले. दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ करून खंडणीबाबत वाच्यता केल्याने हा अपहरणाचा प्रयत्न होता, असे अग्रवाल यांच्या लक्षात आले. त्यामुळे अग्रवाल यांच्यावतीने वाहनचालकाने धंतोली ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. प्रकरण हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, दोन महिने निघून गेले. २८ जूनला अपहरणकर्त्यांनी राजेंद्र अग्रवाल यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करून त्यांना धमकावणे सुरू केले. ‘२८ जूनला तू बचावला. ५० लाखांची खंडणी दिली नाही तर तू आता वाचणार नाही’, अशी धमकीही आरोपी देत होते. अग्रवाल फोन कापत असल्यामुळे आरोपींनी त्यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत मेसेज पाठविला. त्यांनी हा प्रकार धंतोली पोलिसांना कळविला. वरिष्ठांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. मध्यभारतातील एका प्रमुख उद्योजकांच्या अपहरणाचा प्रयत्न करणारे आरोपी त्यांना पुन्हा खंडणीसाठी धमकावत असल्याच्या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर धंतोली पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचेही पोलीस या हायप्रोफाईल प्रकरणाचा समांतर तपास करू लागले.अखेर छडा लागलाआरोपींनी ज्या मोबाईलचा वापर केला. त्या मोबाईलधारकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या व्यक्तीने आपला मोबाईल चोरीला गेला होता, त्याची तक्रारही आपण पोलिसांकडे यापूर्वी नोंदविल्याचे सांगितले.त्यामुळे पोलिसांनी त्या मोबाईलच्या आधारे पुन्हा काही नंबर मिळवले. त्यातील एक मोबाईल नंबर पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर) याचा असल्याचे आणि तो संबंधित मोबाईल वापरणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पप्पू ऊर्फ श्यामबहादूर हा मूळचा रायबरेलीचा आहे. आधी तो अग्रवाल यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करायचा. त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात घेऊन त्याला २०१४ मध्ये काढून टाकण्यात आले होते. ही पार्श्वभूमी कळताच पोलीस उपायुक्त राकेश ओला, धंतोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे पीएसआय अनंत वडतकर, नायक विरेंद्र गुळरांधे, विनोद वडस्कर, दिनेश घुगे, सुरेश जाधव, पंकज हेडावू, हेमराज बेरार, देवेंद्र भोंडे, कमलकिशोर चव्हाण यांनी संशयाच्या आधारे पप्पूला सोमवारी रात्री ताब्यात घेतले. त्याला बाजीराव दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपणच अपहरणाची टीप दिल्याचे कबूल करून या प्रकरणातील आरोपी सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) यांची नावे सांगितली. हे सर्व आरोपी रामबाग, इमामवाड्यातील रहिवासी आहेत. सिंगसह या सर्वांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांना पोलिसांनी आज कोर्टात हजर करून त्यांचा ९ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला. त्यांच्या एका फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.शर्ट सारखे घातल्यामुळे टळले अपहरणअग्रवाल यांचे अपहरण करून त्यांच्याकडून किमान ५० लाखांची खंडणी वसुलण्याचा कट आरोपींनी रचला होता. अग्रवाल यांचे नातेवाईक ५० लाख रुपये सहज देतील, असे पप्पूने आपल्या साथीदारांना सांगितले होते. त्यानुसार २८ एप्रिलला पप्पू वगळता अन्य पाच आरोपींनी विनोद गेडामची कार (व्हॅन) घेतली. घरापासूनच आरोपी अग्रवाल यांच्या मागावर होते. मात्र, ट्रॅफिकमुळे अग्रवाल पुढे निघून गेले. मंदिरात प्रसाद वितरित करताना उन्हाचा त्रास झाल्याने ते आपल्या वाहनात जाऊन बसले. अग्रवाल यांचा वाहनचालक कपिलराज चव्हाण हा प्रसाद वाटू लागला. आरोपींनी बघितले नव्हते. मात्र, ते निळा शर्ट घालून आहे, असे श्यामबहादूरने सांगितले होते. वाहनचालक चव्हाण यानेही निळा शर्ट घातला होता. त्यामुळे आरोपींनी त्यालाच अग्रवाल समजून मारहाण करीत आपल्या कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला होता.

असे काही घडलेच नाही : अग्रवाल२८ एप्रिलला आपल्या वाहनचालकासोबत आरोपीची बाचाबाची झाली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी अपहरणाचा कट होता, असे सांगितल्याचे आपल्याला समजते. आपला प्रत्यक्ष या प्रकरणाशी संबंध नाही, असा माहितीवजा खुलासा हल्दीराम फूड प्रा. लि. कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण