नागपुरात महिला मुलींमध्ये दहशत पसरविणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:20 PM2020-06-05T23:20:58+5:302020-06-05T23:22:27+5:30

शहरातील विविध भागात महिला मुलींचा विनयभंग करून प्रचंड दहशत निर्माण करणारा विकृत गुन्हेगार अंबाझरी पोलिसांनी अखेर पकडला. विजय दुधराम मेश्राम (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो वाडी (लावा) च्या महादेव नगरात विश्राम लॉनजवळ राहतो.

Arrested spreading terror among women and girls in Nagpur | नागपुरात महिला मुलींमध्ये दहशत पसरविणारा गजाआड

नागपुरात महिला मुलींमध्ये दहशत पसरविणारा गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्दे५० पेक्षा जास्त महिला-मुलींचा विनयभंग : अंबाझरी पोलिसांनी बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागात महिला मुलींचा विनयभंग करून प्रचंड दहशत निर्माण करणारा विकृत गुन्हेगार अंबाझरी पोलिसांनी अखेर पकडला. विजय दुधराम मेश्राम (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो वाडी (लावा) च्या महादेव नगरात विश्राम लॉनजवळ राहतो. महिला मुलींचा विनयभंग करण्याची विकृती त्याला जडलेली आहे. तो एका कंपनीत कामाला असून कामावर जाताना आणि परत येताना जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलेल्या महिला मुलींच्या मागून जाऊन तो त्यांचा विनयभंग करतो आणि पळून जातो. त्याने अशा प्रकारे १० महिन्यात अंदाजे ४० ते ५० महिला मुलींची छेड काढलेली आहे. ३ जूनला रात्री ८ च्या सुमारास अंबाझरीतील एक तरुणी तिच्या भावासोबत रस्त्याने फिरत असताना आरोपी विजय मेश्राम याने तिची छेड काढली आणि पळून गेला. तरुणीने आरोपीच्या दुचाकीचा नंबर टिपला आणि पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली. अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. काही तासात पोलिसांनी आरोपीचा पत्ता हुडकून काढला. शुक्रवारी आरोपी विजय मेश्रामला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.

बदनामीच्या धाकामुळे अनेक गप्प
विकृती जडलेला आरोपी विजय मेश्राम याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबानुसार त्याने ते १० महिन्यात जयताळा, प्रतापनगर, शंकरनगर, आठ रस्ता चौक परिसर, भरतनगर, रामनगर अशा भागात सुमारे ४० ते ५० महिला मुलींचा विनयभंग केला आहे. अनेकींनी बदनामीच्या धाकामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार दिली नाही. मात्र तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या दुचाकीचा क्रमांक एमएच ४०/ एडी २४३२ कळताच आरोपीच्या मुसक्या बांधण्यात यश मिळविले. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक पोलीस आयुक्त विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय करे, उपनिरीक्षक सचिन जाधव, फौजदार शरद मिश्रा, आशिष कोहळे, नायक अंकुश घाटी, श्रीकांत उईके, संतोष वानखेडे आणि सचिन बनसोड यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Arrested spreading terror among women and girls in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.