शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून आर्किटेक्टची हत्या

By admin | Updated: September 7, 2016 02:37 IST

दुचाकीस्वार हल्लेखोराने माऊझरमधून अंदाधुंद गोळ्या झाडून शहरातील एका ज्येष्ठ आर्किटेक्टची हत्या केली.

दुचाकीवरील हल्लेखोराने झाडल्या गोळ्या : उपराजधानीत खळबळनागपूर : दुचाकीस्वार हल्लेखोराने माऊझरमधून अंदाधुंद गोळ्या झाडून शहरातील एका ज्येष्ठ आर्किटेक्टची हत्या केली. एकनाथराव धर्माजी निमगडे (वय ७२) असे मृताचे नाव असून ते गंजीपेठमध्ये राहत होते. अत्यंत वर्दळीच्या अग्रसेन चौकाजवळ मंगळवारी सकाळी ७.४५ ते ८ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सधन कुटुंबातील सदस्य असलेल्या निमगडे यांच्या परिवारात पत्नी शिला, अनुपम आणि उज्ज्वल ही दोन मुले आणि मुलगी मृणालिनी असून ती बल्लारपूरला बँकेत अधिकारी आहे. निमगडे रोज सकाळी पत्नी शिल्पासह फिरायला जात होते. स्कूटीने घरून निघाल्यानंतर गांधीबाग गार्डनजवळ स्कूटी ठेवायची. गार्डन परिसरात पायी फिरल्यानंतर पुन्हा स्कूटीने घराकडे परत जायचे, असा त्यांचा नित्यक्रम होता. आज काही अपरिहार्य कारणामुळे ते एकटेच फिरायला आले. ७.४५ च्या सुमारास स्कूटीने घराकडे जात असताना त्यांच्या मागावर असलेल्या अ‍ॅक्टीव्हावरील हल्लेखोराने अग्रसेन चौकाजवळच्या मिर्झा गल्लीत त्यांना गाठले. शुकशुक करून निमगडे यांना थांबवल्यानंतर हल्लेखोराने माऊझर काढून एका पाठोपाठ आठ गोळ्या झाडल्या.हातावर तसेच शरीरात अनेक गोळ्या लागल्याने निमगडे स्कूटीवरून खाली पडले. त्यानंतर आरोपी पळून गेला. गोळीबार आणि निमगडे यांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूची मंडळी खाली धावली. पोलिसांना कळविण्यात आले.हल्लेखोरांच्या शोधासाठी १५ पथके नागपूर : तहसीलचे ठाणेदार संतोष खांडेकर यांच्यासह ठाण्यातील पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. बेशुद्धावस्थेतील निमगडे यांना मेयोत नेण्यात आले. तेथे अतिदक्षता कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ज्येष्ठ नागरिकाला दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याच्या वृत्ताने पोलीस प्रशासनासह सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. सुहास वारके, अतिरिक्त आायुक्त (गुन्हे) रंजनकुमार शर्मा, उपायुक्त राजकुमार यांनी घटनास्थळी आणि नंतर मेयोत धाव घेतली. हत्येमागची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी कुटुंबीयांशी पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली असता धक्कादायक माहिती पुढे आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसील पोलीस ठाणे तसेच गुन्हेशाखेतील १५ अधिकारी आणि १०० पोलिसांचा समावेश असलेली १५ पथके निमगडे यांच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी कामी लावण्यात आली. प्रत्यक्षदर्शी आणि आजूबाजूच्या अनेकांकडून आरोपीसंदर्भात माहिती घेण्यात आली. मारेकरी काळ्या रंगाच्या अ‍ॅक्टीव्हावर होता अन् त्याने तोंडावर दुपट्टा (स्कार्फ) बांधला होता, अशी प्राथमिक माहिती पुढे आली. (प्रतिनिधी)मालमत्तेसाठी अनेकांच्या उड्या अनुपम यांच्या माहितीनुसार, एकनाथराव निमगडे यांनी १९८० ला इंडियन सिटीझन वेल्फेयर मल्टीपर्पज सोसायटी बनविली होती. सोसायटीचे ते सचिव होते. वर्धा मार्गावर असलेल्या साडेपाच एकर जमिनीचा सौदा ट्रान्सपोर्टर सिद्दीकी सोबत निमगडे यांनी केला होता. त्यापोटी निमगडे यांनी सिद्दीकी यांना १४ लाख रुपये दिले होते. हा सौदा वादग्रस्त ठरला अन् प्रकरण कोर्टात गेल्यानंतर समेट करण्याच्या उद्देशाने कोर्टाने ४० लाख रुपये देण्याचा आदेश दिला होता. मात्र, आजघडीला या जमिनीची किंमत सुमारे १०० कोटींच्या वर आहे. त्यामुळे सिद्दीकीने जमिनीची विक्री करून देण्यास नकार दिला. त्यानंतर कोर्टात ‘तारीख पे तारीख’ खेळ सुरू झाला. दरम्यान, या वादग्रस्त जमिनीच्या बाजूला पायोनियर समूहाचे अनिल नायर यांची जमीन आहे. अनुपम यांच्या माहितीनुसार, सिद्दीकीच्या माध्यमातून नायर एकनाथराव निमगडे यांच्यावर जमीन विक्रीसाठी दबाव टाकत होते. त्यातच या वादग्रस्त जमिनीतून डीपी रोड मंजूर झाला. त्याला निमगडे यांनी कोर्टात आव्हान दिले होते. हे सर्व सुरू असतानाच सिद्दीकीसोबत ग्रीन लिवरेजचे संचालक आदित्य गुप्ता यांनी जमिनीचा सौदा केला. लेआऊट मंजुरीसाठीही प्रयत्न सुरू केले. निमगडे यात अडसर ठरत असल्याने त्यांना धमकीही देण्यात आली होती, असा आरोप आहे. त्यातूनच ही हत्या झाल्याचाही संशय आहे.