शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भशास्त्र विभागप्रमुखाची नियुक्ती रद्द

By admin | Updated: April 21, 2016 03:18 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी डॉ. दीपक मलपे यांची भूगर्भशास्त्र विभाग प्रमुखपदी नियुक्ती..

हायकोर्टाचा दणका : विद्यापीठाचा निर्णय ठरवला अवैधनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी डॉ. दीपक मलपे यांची भूगर्भशास्त्र विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय अवैध ठरवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दणका दिला. तसेच, या पदावर कायद्यानुसार नियुक्ती करण्याचे निर्देश दिलेत.या नियुक्तीविरुद्ध डॉ. अनिल पोफरे यांनी रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांनी ही याचिका मंजूर करून वरीलप्रमाणे निर्वाळा दिला. याचिकेतील माहितीनुसार, डॉ. मलपे हे डॉ. पोफरे यांच्यापेक्षा सेवेत १६ दिवसांनी कनिष्ठ आहेत. वरिष्ठता यादीनुसार पोफरे विभाग प्रमुखपदाचे दावेदार आहेत. असे असताना विद्यापीठाने २५ मे २०१५ रोजी मलपे यांची विभाग प्रमुखपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती अवैध असल्याचा दावा करून पोफरे यांनी २५ मे रोजी विद्यापीठाचे कुलगुरूंकडे तक्रार सादर केली होती. तसेच, ६ जुलै रोजी कुलपतींना निवेदन सादर केले होते. परंतु, त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी पोफरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)