PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:04 IST2026-04-03T13:04:44+5:302026-04-03T13:04:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत नागपूर महापालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) नागरिकांकरिता ...

Applications for Pradhan Mantri Awas Yojana can be submitted till April 15 | PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुभा

PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत नागपूर महापालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) नागरिकांकरिता योजना मौजा-नारी भागात उभारण्यात येणाऱ्या ५१८ सदनिका घरकुल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत येत्या १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

महापौर नीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या देखरेखीत नागरिकांना परवडणाऱ्या घरे योजने अंतर्गत वन बीएचके व टू बीएचके स्वप्नपूर्ती घरकुल योजना मौजा-नारी भागात उभारण्यात येणार आहे. वन बीएचके स्वप्नपूर्ती घरकुल ३५०.३७ चौरस फूट तर टू बीएचके घरकुलाचे ४८४.३८ चौरस फूट इतके चटई क्षेत्रफळ राहणार आहे. यात वन बीएचके घरकुल २१० तर टू बीएचके घरकुलांची संख्या ३०८ राहणार आहे. यात अनुसूचित जाती–जमाती व इतर मागासवर्गीयांना नियमाप्रमाणे आरक्षण लागू राहणार आहे.

वन बीएचके घरकुलाची किंमत १५ लाख ५१ हजार ६७२ रुपये आहे. तर, टू बीएचके घरकुल २१ लाख १ हजार ७४८ रुपयांना उपलब्ध होणार आहे. या दोन्ही घरकुलांसाठी शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २ लाख ५० हजार रुपयांच्या अनुदानाला लाभार्थी पात्र ठरणार आहे. 

Web Title : पीएम आवास योजना: आवेदन की अंतिम तिथि 15 अप्रैल तक बढ़ाई गई

Web Summary : नागपुर नगर निगम ने पीएम आवास योजना के लिए आवेदन की अंतिम तिथि 15 अप्रैल तक बढ़ा दी है। मौजा-नारी में आर्थिक रूप से कमजोर वर्गों के लिए 518 किफायती घर बनाए जाएंगे। सरकारी सब्सिडी के साथ 1बीएचके और 2बीएचके विकल्प उपलब्ध हैं।

Web Title : PM Awas Yojana: Application Deadline Extended to April 15th

Web Summary : Nagpur Municipal Corporation extends PM Awas Yojana application deadline to April 15th. 518 affordable homes will be built in Mouza-Nari for economically weaker sections. 1BHK and 2BHK options are available with government subsidies.