शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

अर्ज १७२ मंजूर मात्र१३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:00 AM

नियमांचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही दिल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती स्थापित करण्याला अनुमती दिली जात आहे.

ठळक मुद्देनियमांच्या कात्रीत अडकले गणेश मंडळ : पोलीस व वाहतुकीची परवानगी घेताना अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियमांचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही दिल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती स्थापित करण्याला अनुमती दिली जात आहे. महापालिकेच्या सर्व १० झोनमध्ये यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांत १७२ मंडळांनी अर्ज केले. परंतु आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने १३ मंडळांनाच अनुमती देण्यात आली आहे.स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक विभागाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जात आहे. परंतु पोलीस व वाहतूक विभागाकडून अनुमती घेताना अडचणी येत आहे. अर्धवट सिमेंट रोड, मेट्रो रेल्वे, उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याने प्रमुख मार्गावर गणेशोत्सवासाठी अनुमती देताना अडचणी येत आहे.न्यायालयाच्या दिशा-निर्देशानुसार गेल्यावर्षी मंडळासाठी नियमावली तयार करण्यात आली. यावेळी या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी सक्ती केली जात आहे. गेल्यावर्षी १२०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अनुमतीसाठी अर्ज केले होते. यातील ८५० मंडळांनाच आवश्यक दस्तऐवज सादर करणे शक्य झाले. मंडळांना सुविधा व्हावी यासाठी अग्निशमन विभागात याची व्यवस्था करण्यात आली होती. अखेरच्या दिवशी ३०० मंडळांनी अर्ज केले होते. यामुळे अनुमती देताना कर्मचाºयांची दमछाक झाली होती.याचा विचार करता, यावेळी झोनस्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पोलीस व वाहतूक विभागाच्या सक्तीमुळे अद्याप बहुसंख्य मंडळांनी अर्ज केलेले नाही.कृत्रिम तलावांची सुविधा२५ आॅगस्टला गणरायांचे आगमन होत आहे. त्यामुळे २३ व २४ आॅगस्टला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणपतींना वाजतगाजत आणले जाणार आहे. चितार ओळ तसेच शहराच्या विविध भागात दुकाने थाटण्यात आलेली आहेत. महापालिका प्रशासनातर्फे गांधीसागर व सोनेगाव तलावाच्या एका बाजूला कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तसेच फुटाळा व सक्करदरा तलावासह प्रमुख तलावाच्या ठिकाणी विसर्जनाचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात तसेच चौकाचौकात कृत्रिम तलाव ठेवण्यात येणार आहे. प्रभागातही ही सुविधा राहणार आहे.मूर्ती विक्रे त्यांची होणार चौकशीप्लास्टर आॅफ पॅरिस (पीओपी) मूर्तीची खरेदी-विक्री करण्यावर राज्य शासनाने निर्देश जारी केलेले आहे. त्यानुसार मूर्तीवर लाल निशाणी लावणे, विसर्जनााठी जनजागृती करणारे बॅनर लावण्याची यात तरतूद आहे. परंतु याचे पालन होत नाही. मूर्ती विक्रेते याचे पालन करतात की नाही, याची शहानिशा करणार असल्याची माहिती महापालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली.