एपीचे नाव झाले तेलंगणा एक्स्प्रेस

By Admin | Updated: November 16, 2015 02:49 IST2015-11-16T02:49:18+5:302015-11-16T02:49:18+5:30

भारतीय रेल्वेत काही मोजक्याच रेल्वेगाड्या सर्वदूर प्रसिद्ध आहेत. यात हैदराबाद आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या एपी एक्स्प्रेसचा समावेश आहे.

AP named Telangana Express | एपीचे नाव झाले तेलंगणा एक्स्प्रेस

एपीचे नाव झाले तेलंगणा एक्स्प्रेस

नागपुरात दाखल : ३९ वर्षांची एपी एक्स्प्रेस इतिहासजमा
नागपूर : भारतीय रेल्वेत काही मोजक्याच रेल्वेगाड्या सर्वदूर प्रसिद्ध आहेत. यात हैदराबाद आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या एपी एक्स्प्रेसचा समावेश आहे. १९७६ मध्ये सुरूझालेली ही गाडी १२७२३/१२७२४ आंध्र प्रदेश एक्स्प्रेस नावाने ओळखल्या जाऊ लागली. रविवारपासून या गाडीचे नाव बदलून तेलंगणा एक्स्प्रेस ठेवण्यात आले असून एपी एक्स्प्रेस हे नाव इतिहासजमा झाले आहे.
एपी एक्स्प्रेस १६७७ किलोमीटरचा प्रवास २७ तासात पूर्ण करून महाराष्ट्र, मध्य प्रदेश या मार्गाने नवी दिल्लीला जाते. तेलंगणा एक्स्प्रेस ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्यानंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. परंतु थोड्याच वेळात या गाडीचे नाव बदलल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवासी गाडीत चढले. सुरुवातीला या गाडीला नवी दिल्ली ते सिकंदराबाद चालविण्यात येत होते.
परंतु हळूहळू या गाडीचा विस्तार होऊन ती हैदराबादपर्यंत धावू लागली. २०१४ मध्ये तेलंगणा राज्याची घोषणा झाल्यानंतर एपी एक्स्प्रेसचे नाव तेलंगणा ठेवण्याची मागणी पुढे आली. हैदराबादला तेलंगणाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याच धर्तीवर १५ नोव्हेंबरला रेल्वे मंत्रालयाने एपी एक्स्प्रेसचे नाव बदलवून तेलंगणा एक्स्प्रेस केले. (प्रतिनिधी)

Web Title: AP named Telangana Express