शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

आणखी २३७५ बाधित, १७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:08 IST

सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड/ कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ वाढतीवर आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात बुधवारी ...

सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड/ कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ वाढतीवर आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात बुधवारी आणखी २३७५ रुग्णांची भर पडली, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची संख्या ७२,०६८ झाली आहे. आतापर्यंत १३१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ११४५ रुग्ण बरे झाले. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३,६१८ इतकी झाली आहे.

सावनेर तालुक्यात ४७६ रुग्णांची नोंद झाली, तर दोघांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात १४५, तर ग्रामीणमध्ये ३३१ रुग्णांची भर पडली.

कळमेश्वर तालुक्यात ३११ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील २६ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात मोहपा येथे सर्वाधिक ५३ रुग्णांची नोंद झाली.

कुही तालुक्यात ४२ रुग्णांची नोंद झाली. कुही येथील कोविड केअर सेंटरवर ८३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २२०६ इतकी झाली आहे.

काटोल तालुक्यात ६७ रुग्णांची भर पडली. यात काटोल शहरातील ४७, तर ग्रामीण भागातील २० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये कोंढाळीत सर्वाधिक १४ रुग्णांची नोंद झाली. नरखेड तालुक्यात ११३ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १७, तर ग्रामीण भागातील ९६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १०२८, तर शहरात २०३ झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावअंतर्गत ५८, जलालखेडा (२४), मेंढला (४), तर मोवाड येथे १० रुग्णांची नोंद झाली.

रामटेक तालुक्यात ८० बाधित

रामटेक तालुक्यात ८० रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४२, तर ग्रामीण भागातील ३८ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ३२८६ झाली आहे. यातील १६९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५९२ इतकी आहे.