निशांत वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अभिजात असलेल्या मराठी भाषेच्या एकूणच वाङ्मयीन इतिहासात विदर्भाचे योगदान कायमच अनुल्लेखित राहिले आहे. ही स्थिती दूर करण्यासाठी विदर्भातील साहित्यिक, मराठी अभ्यासक, संशोधकांनी मोठी धुरा खांद्यावर घेतली आहे. अगदी प्राचीन काळापासून ने आतापर्यंतचा विदर्भातील वाङ्मयीन इतिहास धुंडाळून तो १२ खंडांतून वाचकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यातील ४ खंड हे पूर्णत्वाच्या तयारीत आहेत. हे खंड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित केले जाणार आहेत.
मराठी वाङ्मयाच्या समग्र इतिहास लेखनात महाराष्ट्रातील विविध विभागांच्या, विविध वाङ्मय प्रकारांच्या इतिहासाची दखल पुरेशी घेतली जाऊ शकलेली नाही. एखाद्या वाङ्मय प्रकाराचा प्रदेशनिहाय समग्र इतिहासाचा ग्रंथदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे प्रादेशिक लेखन, लेखक, त्यांचे कार्य, कर्तृत्व, प्रादेशिक प्रतिभा यांचे उल्लेखदेखील मराठी वाङ्मयाच्या उपलब्ध इतिहासात वगळले गेले आहेत.
इतिहासातून सुटुन जाणाऱ्या महत्त्वाच्या आणि उल्लेखनीय असूनही अनुल्लेखित राहणाऱ्या वैदर्भीय प्रतिभेचे दर्शन, वेगळ्या वाटा, प्रवाह, वळणे, प्रतिभा यावर भर असणाऱ्या नोंदीचे स्थानिक, प्रादेशिक वाङ्मय इतिहास लिहिले जाण्याची गरज आहे. त्या दृष्टीने 'मराठी वाङ्मयाचा वैदर्भीय इतिहास' हा एक प्रकल्प या प्रकल्पाचे संकल्पक आणि संपादक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी हाती घेतला आहे. विदर्भातील सर्वच पिश्चांचे लेखक, लेखन, प्रवाह, दर्जा, गुणवत्ता, प्रभाव, परिणाम यांचे एकत्र असे प्रातिनिधिक दर्शन या प्रकल्पामुळे प्रथमच घडणार आहे. प्रत्येक वाङ्मय प्रकारात उल्लेखनीय असे काही सुटू नये आणि हे खंड सर्वसमावेशक व्हावे यासाठी लेखकांनी, वाचकांनी, अभ्यासक, संग्राहक, तसेच इतर सान्यांनी माहिती पुरवावी, असे आवाहन श्रीपाद जोशी यांनी केले.
तीन कालखंडात विभागणी
- विदर्भातील कविता, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र, बालसाहित्य, वैचारिक/शास्त्रीय लेखन, सैद्धांतिक/तात्त्चिक लेखन, अनुवादित साहित्य, लोकसाहित्य, भाषा अशा विविध प्रकारातील प्रत्येकी सुमारे २५० पृष्ठांचा एक खंड या प्रकल्पांतर्गत लिहून घेऊन ते खंड प्रकाशित केले आप्णार आहेत.
- प्रत्येक खंडातील प्रत्येक प्रकारात प्राचीन काळापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत स्वातंत्र्यपूर्व कालखंड, १९४७ ते १९९० हा स्वातंत्र्योत्तर कालखंड व १९९० ते आजतागायत असा नव्वदोत्तरी कालखंड असा वाङमयाचा प्राचीन ते अद्ययावत इतिहास उपलब्ध करून दिला जाणार आहे.
"खरे तर हे काम प्रत्येक विभागातील विभागीय साहित्य संस्थेने केशाय करणे आवश्यक होते, मात्र ते झालेले नसल्याने हा प्रकल्प हाती घ्यावा लागला आहे. वैदर्भीय मराठी वाडमयाचा इतिहास या निमित्ताने प्रथमच उपलब्ध होणार आहे."-श्रीपाद भालचंद्र जोशी