शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसर, पुणे एसी स्पेशल रेल्वेगाड्या

By admin | Updated: January 3, 2016 03:31 IST

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे आणि नागपूर-अमृतसर दरम्यान प्रत्येकी आठ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची सुविधा : अतिरिक्त गर्दी पाहून निर्णयनागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे आणि नागपूर-अमृतसर दरम्यान प्रत्येकी आठ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ०२१२४ नागपूर-पुणे वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी मंगळवारी (५, १२, १९, २६ जानेवारी) नागपूरवरून सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी वर्धाला रात्री ८.५०, धामणगाव ९.३५, बडनेरा १०.३७, अकोला येथे रात्री ११.४० वाजता आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२१२३ पुणे-नागपूर एसी स्पेशल रेल्वेगाडी प्रत्येक बुधवारी (६, १३, २० आणि २७ जानेवारी) पुण्यावरून दुपारी ३.१५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी अकोला येथे रात्री १२.५०, बडनेरा २.२५, धामणगाव ३.०२, वर्धा ३.४० आणि नागपूरला पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, दौंड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्यात १ एसी फर्स्ट, ४ एसी टु टायर, ९ एसी थ्री टायर असे एकूण १४ कोच राहतील. दोन्ही गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२१२५ नागपूर-अमृतसर ही गाडी प्रत्येक शनिवारी (९, १६, २३, ३० जानेवारीला) नागपूरवरून सायंकाळी ५.५० वाजता सुटेल. ही गाडी अमृतसरला दुसऱ्या दिवशी रात्री ९.०५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२१२६ अमृतसर-नागपूर वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी प्रत्येक सोमवारी (११, १८, २५ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला) अमृतसरवरून पहाटे ४.२० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता पोहोचेल.दोन्ही गाड्यांना भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट, नवी दिल्ली, अंबाळा, लुधियाना, जालंधर येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात १ एसी फर्स्ट, ४ एसी टु टायर, ९ एसी थ्री टायर कोच आहेत. दोन्ही गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)