योगेश पांडे, नागपूरदेशातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षांनी भाजपाच्या हातात देशाची सत्ता सोपविली आहे. पक्षातील अंतर्गत वाद टाळून नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. साधनशुचिता हीच भाजपाची खरी ओळख आहे़ तेवढी सांभाळा, असा कानमंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिला. शहा यांनी शुक्रवारी संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन सरसंघचालकांशी सुमारे दीड तास चर्चा केली.निवडणुकांनंतर निर्माण होत असलेले वैदिक प्रकरणासारखे निष्कारण वाद यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन होत आहे. अशा वादांपासून व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मुद्द्यांपासून भाजपा नेत्यांनी दूर राहावे. देशातील भ्रष्टाचार, महागाई आणि सुरक्षा यांच्याकडे पाहून देशाने भाजपाला कौल दिला. जर पक्षाला मजबूत करायचे असेल तर भावनिक मुद्द्यांपेक्षा या अपेक्षांच्या पूर्ततेवर जोर देण्यात यावा अन्यथा पाच वर्षांनंतर जनता भाजपालाही ‘जागा’ दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही सरसंघचालकांनी दिला़
अमित शहांना ‘बौद्धिक’
By admin | Updated: July 19, 2014 02:15 IST