शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या प्रकरणात आंबेकरला कारागृहातच अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 01:00 IST

पोलिसांच्या गुन्हे शाखेने गँगमास्टर संतोष आंबेकर याला बलात्काराच्या प्रकरणात बुधवारी थेट कारागृहातच अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले जाईल.

ठळक मुद्देआज न्यायालयात पेशी : सुटकेच्या मार्गात पुन्हा अडचण वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांच्या गुन्हे शाखेने गँगमास्टर संतोष आंबेकर याला बलात्काराच्या प्रकरणात बुधवारी थेट कारागृहातच अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले जाईल. १२ ऑक्टोबरपासून तो अटकेत असून नवनव्या गुन्ह्याखाली त्याच्यावर कलमा दाखल होत आहेत. त्याच्या विरोधात पाच कोटी रुपयांच्या ठगबाजीचा आणि एक कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप आहे. लकडगंज येथील एका युवतीच्या यौन शोषण प्रकरणी आता त्याच्यावर नवा गुन्हा दाखल झाला आहे.ही युवती अवयस्क असताना आंबेकरकडून तिचे यौन शोषण होत होते, असा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पीडितेला मुंबई, बंगळुरुसह अन्य शहरांमध्ये नेले होते. तिच्या घरीही त्याचे येणेजाणे असायचे. तो आपल्या कार्यालयातही तिचे शोषण करायचा. तिला मोठे नेते, विख्यात माणसे, मुंबईतील गुन्हेगारी जगतातील माणसांसोबत त्याचे असलेली छायाचित्र दाखवून तो घाबरवत असे. यामुळेच आजवर तिने पोलिसात तक्रार केली नव्हती. मात्र ठगबाजी आणि वसुलीच्या प्रकरणात आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदार याच्या अटकेनंतर तिने हिंमत केली आणि पोलिसात तक्रार दाखल केली.ठगबाजी, वसुली या प्रकरणी मकोकामधील पोलीस कोठडी संपल्यापासून आंबेकर कारागृहात आहे. त्याचा सहकारी राजा अरमरकर आणि अन्य आरोपीही कारागृहात आहेत. पोलिसांनी न्यायाालयातून प्रॉडक्शन वॉरंट मिळवून बुधवारी आंबेकरला कारागृहातून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेकरची काही विश्वासू माणसे सुरुवातीला त्या पीडित युवतीला प्रभावित करण्याच्या कामी लागले होते. मात्र आंबेकरविरूद्ध आरोप दाखल होण्याची मालिका सुरू होताच त्यांनी हा नाद सोडला.आंबेकरने पीडित युवतीप्रमाणेच अनेक महिलांचेही यौन शोषण केल्याचे सांगितले जाते. मात्र अशा प्रकरणांच्या तक्रारीसाठी आतापर्यंत एक-दोन महिलाच पुढे आल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारArrestअटक