दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आरोप असलेला कथित नक्षली अनिल सोरीची निर्दोष सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:55 IST2025-12-31T12:44:00+5:302025-12-31T12:55:50+5:30
Nagpur : २२ मार्च २०१५ रोजी नक्षलविरोधी अभियान राबवीत असलेल्या गडचिरोली पोलिसांवर मुसपारसीजवळच्या घनदाट जंगलामध्ये ६०-७० नक्षलींनी अंदाधुंद गोळीबार केला.

Alleged Naxalite Anil Sori, accused of killing two policemen, acquitted
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गडचिरोलीतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याचा आरोप असलेला कथित नक्षली अनिल उर्फ रसूल सुकानू सोरी उर्फ सुधाकर शंकर सोरी (२८) याला ठोस पुरावे नसल्यामुळे निर्दोष मुक्त केले.
न्यायमूर्तीद्वय अनिल पानसरे व राज वाकोडे यांनी हा निर्णय दिला. सोरी छत्तीसगड येथील रहिवासी आहे. २२ मार्च २०१५ रोजी नक्षलविरोधी अभियान राबवीत असलेल्या गडचिरोली पोलिसांवर मुसपारसीजवळच्या घनदाट जंगलामध्ये ६०-७० नक्षलींनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे दहा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले तर, दोन कर्मचारी मरण पावले. त्यानंतर पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारावर सोरीला अटक करून त्याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. १ फेब्रुवारी २०२१ रोजी सत्र न्यायालयाने सोरीला जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील मंजूर झाले. सोरीतर्फे अॅड. राहुल हजारे यांनी कामकाज पाहिले.