शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

विदर्भात भाजपचा हात आखडता, अजित पवार गटाला एकच जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 07:12 IST

चार जागांवर दावा; भाजपचीही समांतर ‘फिल्डिंग’ जोरात

कमलेश वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील लोकसभेच्या १० पैकी कमीत कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेनेला सोडण्याचा भाजप नेत्यांचा विचार आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप भंडारा-गोंदियाची जागादेखील स्वत: लढविण्याच्या विचारात आहे. अजित पवार गटाला फार तर एक जागा पदरी पाडून घेण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

सन २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला भंडारा-गोंदिया, अमरावती व बुलढाणा या तीन जागा सोडण्यात आल्या होत्या. अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांना राष्ट्रवादीने समर्थन दिले होते. भंडारा-गोंदिया व बुलढाणाची जागा राष्ट्रवादी हरली. अमरावतीत खासदार राणा विजयी झाल्या. आता महायुतीत  या तीन जागांवर अजित पवार गटाने दावा केला आहे. सोबतच गडचिरोली मतदारसंघातून मंत्री धर्मरावबाबा आत्राम लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी त्या दिशेने कामही सुरू केले आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी केली; पण ते स्वत: या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील की नाही, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. 

भाजपने मात्र या मतदारसंघात जोरात तयारी सुरू केली आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणाऱ्या युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत राणा यावेळी अजित पवार गटातून लढतील की भाजपकडून हे त्यांनीदेखील स्पष्ट केलेले नाही. 

संघटनात्मक मजबूत करण्यासाठी भाजप जास्त तडजोडीच्या मूडमध्ये दिसत नाही. अजित पवार गटाला एखाद्या जागेवर समाधान मानावे लागेल.

टॅग्स :BJPभाजपाPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस