पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; अजित पारसेची व्यसनमुक्ती केंद्रातून रुग्णालयात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 01:06 PM2022-10-19T13:06:11+5:302022-10-19T13:08:51+5:30

पोलिसांकडून अटकेसाठी ‘वेट ॲंड वॉच’

Ajit Parse attempt suicide again; Referred to hospital from de addiction centre | पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; अजित पारसेची व्यसनमुक्ती केंद्रातून रुग्णालयात रवानगी

पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; अजित पारसेची व्यसनमुक्ती केंद्रातून रुग्णालयात रवानगी

Next

नागपूर : एका होमिओपॅथी डॉक्टरची साडेचार कोटींनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तथाकथित सोशल मीडियातज्ज्ञ अजित पारसेची सोमवारी व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी करण्यात आली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याने त्याची रुग्णालयात रवानगी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून पारसेचा संताप वाढला असून, तो विक्षिप्तपणे वागत आहे. त्याला मानसिक धक्का बसल्याचा दावा त्याचे निकटवर्तीय करत आहेत. या प्रकारामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सोमवारी (दि. १७) व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. तशी माहिती पोलिसांनादेखील देण्यात आली होती. व्यसनमुक्ती केंद्रातदेखील तो आक्रमक झाला व त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला परत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकारामुळे पोलीस हैराण झाले आहेत. अजितवर पहिला गुन्हा दाखल होताच त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्यांची प्रकृती कमकुवत असल्याने घरीच उपचार सुरू होते. प्रकृतीचे कारण व त्याच्याकडून होणारे आत्महत्येचे प्रयत्न यामुळे पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. पोलिसांनी सध्या ‘वेट ॲंड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, अजितवर काही महिन्यांअगोदर सर्जरी करण्यात आली होती. त्याला लिव्हरची समस्या असून काही दिवसांअगोदर त्याच्यावर हर्नियाचीदेखील शस्त्रक्रिया झाली होती.

Web Title: Ajit Parse attempt suicide again; Referred to hospital from de addiction centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.