शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अजनी होणार सॅटेलाईट टर्मिनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 02:33 IST

प्रवाशांची रेलचेल असल्यामुळे नागपूरच्या मुख्य रेल्वेस्थानकावर नेहमीच गर्दी आढळते. त्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री

दयानंद पाईकराव/आनंद शर्मा ल्ल नागपूर प्रवाशांची रेलचेल असल्यामुळे नागपूरच्या मुख्य रेल्वेस्थानकावर नेहमीच गर्दी आढळते. त्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री पवन बंसल यांनी अजनी रेल्वेस्थानकास टर्मिनलचा दर्जा दिला. त्यानंतर एक पाऊल पुढे टाकत रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अजनीला सॅटेलाईट टर्मिनलच्या रूपाने विकसित करण्याची घोषणा केली. परंतु आजमितीस येथे फक्त सहा रेल्वेगाड्या थांबतात. नव्यानेच रुजू झालेले ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी अजनीला अधिकाधिक रेल्वेगाड्या थांबविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविल्यामुळे अजनी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढून अजनी खऱ्या अर्थाने सॅटेलाईट टर्मिनल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूरच्या मुख्य रेल्वेस्थानकावर ११० ते १२५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. यामुळे ५० ते ६० हजार प्रवाशांची गर्दी होते. येथे नेहमीच पार्किंग आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अजनी रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. तत्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी अजनी रेल्वेस्थानकाला आधुनिक स्वरूप प्राप्त करून तेथे सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अजनीला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा दिल्यानंतरही अजनीला फक्त सहा रेल्वेगाड्या थांबत आहेत. त्यामुळे मुख्य रेल्वेस्थानकावरील ताण कमी करण्यासाठी ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. पश्चिम आणि दक्षिण नागपुरातील बहुतांश प्रवासी ज्या गाड्यातून उतरतात, त्या गाड्या हेरून त्यांनी या गाड्यांचा थांबा अजनीला देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे रवाना केला आहे. या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळताच अजनी स्थानकाचा सॅटेलाईट टर्मिनल होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अजनी स्थानकावर रेल्वेगाड्या थांबल्यास प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. सध्या दक्षिण आणि पश्चिम नागपुरातील प्रवाशांना मुख्य रेल्वेस्थानकावर जाऊन १०० ते १५० रुपये आॅटोसाठी खर्च करून आपल्या घरी जावे लागते. परंतु आता अजनीला गाड्या थांबल्यास त्यांच्या खर्चाची आणि वेळेची बचत होणार आहे. यामुळे भविष्यात अजनी स्थानकावर दररोज १० ते १५ हजार प्रवाशांची वर्दळ होऊन रेल्वे प्रशासन आणि प्रवाशी दोघांचाही फायदा होणार आहे. हे होतील फायदे ४दक्षिण, पश्चिम नागपुरातील प्रवाशांचा फायदा ४प्रवाशांच्या वेळेची आणि पैशाची बचत ४मुख्य रेल्वेस्थानकावरील ताण होणार कमी ४दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा ४मुख्य स्थानकावर आऊटरवर गाड्या थांबणार नाहीत ४मुख्य रेल्वेस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी दूर होईल. अजनीला गाड्या थांबविण्याचा प्रस्ताव रवाना ‘अजनी रेल्वेस्थानकावर अधिक रेल्वेगाड्या थांबल्यास मुख्य रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय पार्किंगचा महत्त्वाचा मुद्दा मार्गी लागणार आहे. त्यासाठी अजनीला अधिक गाड्या थांबविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे.’ - बृजेश कुमार गुप्ता, ‘डीआरएम’ मध्य रेल्वे नागपूर विभाग