शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ रामभरोसे !

By admin | Updated: January 7, 2016 03:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेबाबत अनेक दावे करण्यात आले.

दर्जा आंतरराष्ट्रीय; सुविधा लोकल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष सुरक्षेचे तीन तेरानागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेबाबत अनेक दावे करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात विमानतळावर अनेक असुविधा असून अनेक भागात सुरक्षा भिंत बिनकामाची ठरत आहे. विमानतळाची सुरक्षा रामभरोसे आहे. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या विमानतळावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे.विमानतळाचे हस्तांतरण होऊन सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु तरीसुद्धा विमानतळाच्या सुरक्षा भिंतीची उंची वाढविण्यासाठी आतापर्यंत कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. आॅपरेशनल एरियानंतरच्या भिंतीखाली छिद्रे पडली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डुकरांनी या भिंतीखाली खोदून खड्डे तयार केले आहेत. हे खड्डे एवढे मोठे झाले आहेत की यातून गाय सहज आत येऊ शकते. दोन भिंतीच्या मधील हा भाग जनावरांना चरण्यासाठी कुरण झाला आहे. सोनेगावला लागूून आॅपरेशनल सुरक्षा भिंतीचा एक भाग अजूनपर्यंत तिरपा असून त्याखाली खड्डे आहेत. यालाच लागून वॉच टॉवरही आहे. डुकरांनी घुसखोरी करण्यासाठी तयार केलेले हे रस्ते घातक ठरू शकतात. आजूबाजूच्या काही गावकऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, विमानतळ व्यवस्थापनाला या बाबीकडे गंभीरतेने पाहून कार्य केल्यास त्यांना विमानतळावरील त्रुटींची माहिती मिळेल. (प्रतिनिधी)ही कशाची पाहणी१४ सप्टेंबर २०१५ रोजी राष्ट्रपतींच्या विमानासमोर डुकरांचा कळप आला होता. त्यानंतर डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशन आणि एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमूने विमानतळाची पाहणी करून मुख्यालयाला अहवाल पाठविला होता. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर एक हरीण विमानतळावर पकडण्यात आले. विमानतळावरील त्रुटी दूर केल्यानंतरही जनावरांची घुसखोरी कशी होत आहे, हा प्रश्न आहे. फ्लार्इंग क्लबसमोर कचराविमानतळ परिसरात नागपूर फ्लार्इंग क्लबसमोरील सुरक्षा भिंतीशेजारी कचरा गोळा झाला आहे. या सुरक्षा भिंतीला ये-जा करण्यासाठी तोडण्यात आले आहे. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर या भिंतीला लोखंडी गेट लावण्यात आले. त्यानंतर पुन्हा या भिंतीचा भाग तोडण्यात आला आहे. विमानतळावरील काही कर्मचारी येथूनच ये-जा करतात.