खराब हवामानानंतरही विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:36 IST2025-07-09T13:35:54+5:302025-07-09T13:36:26+5:30
अद्ययावत रनवे व्हिज्युअल रेंज उपकरण : आधी मॅन्युअली व्हायचे दृश्यमानता पाहण्याचे काम

Airplane takeoff and landing despite bad weather!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एक कोटीहून अधिक किमतीचे अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त उपकरण एक महिन्याआधी नागपूर विमानतळावर बसवण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर खराब हवामानातही विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग शक्य होणार आहे.
विमानतळावर अद्ययावत रनवे व्हिज्युअल रेंज (आरव्हीआर) उपकरण बसवण्यात आले आहे. हे स्वयंचलित उपकरण दृश्यमानतेची तंतोतंत गणना करून हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि वैमानिकांना खराब हवामानासह मुसळधार पाऊस, धुके आणि अन्य समस्यांची माहिती पाठवेल. त्यामुळे विमानाचे सुरक्षित टेक ऑफ आणि लँडिंग शक्य होईल. आतापर्यंत हे उपकरण दिल्ली, मुंबई, जयपूर आणि मोठ्या विमानतळांवर बसवण्यात आले आहे. नवीन उपकरणाने १५०० मीटर अंतरावरूनही दृश्यमानतेचा अंदाज घेता येईल. त्यामुळे कमी दृश्यमानतेमुळे अन्य विमानतळावर विमान शक्यता आता राहणार नाही. वळवण्याची शक्यता आता राहणार नाही.
- नागपूर विमानतळावर दररोज ६४ विमानांची ये-जा होते आणि त्याद्वारे ८ हजारांहून अधिक प्रवास करतात. अद्ययावत रडारसह नवीन उपकरणामुळे नागपूर विमानतळ सर्वोत्तम श्रेणीत आले आहे.
- प्राप्त माहितीनुसार, नागपूर २ विमानतळ ५०० मीटरच्या दृश्यमानतेत काम करू शकते. अशी प्रकाश व्यवस्था धावपट्टीवर आहे.
- नागपूरच्या तुलनेत अन्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर याहून सर्वोत्तम प्रकाश व्यवस्था आहे. त्यामुळे वैमानिकाला रात्री कमी दृश्यमानतेतही धावपट्टीची ओळख होते. अशी प्रकाश व्यवस्था तयार करण्यासाठी नागपूर विमानतळाला आणखी वाट पाहावी लागेल.