शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळावर लढण्याचे ध्येय ठेवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST

नागपूर : आगामी काळात नागपूर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात बूथ पातळीवर संघटन बळ‌कट करा. मागे पक्षाला लाजीरवाणा ...

नागपूर : आगामी काळात नागपूर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात बूथ पातळीवर संघटन बळ‌कट करा. मागे पक्षाला लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला आहे, याची आठवण करून देत यावेळी ताकदीने काम करून संघटन उभारा. प्रसंगी स्वबळावर लढण्याचे ध्येय ठेवा, असे प्रोत्साहन देत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर दबाव निर्माण केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यानिमित्त जयंत पाटील यांनी सोमवारी नागपुरातील जैन कलार समाज भवनात नागपूर शहर व ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर नागपूर शहरातील पूर्व, पश्चिम व उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मतेही जाणून घेतली. राज्यात महाविकास आघाडी असली तरी नागपुरात राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये, अशी भूमिका शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. याला उत्तर देण्यासाठी स्वत:चे संघटन अधिक बळकट करण्यावर जयंत पाटील यांनी आढावा बैठकीत भर दिला. तुम्ही मेहनत करा, आम्ही मदतीला तयार आहोत. पक्ष वाढवा, पुढे काय होईल ते पाहू, असे प्रोत्साहन देत काँग्रेसला सूचक इशाराही त्यांनी दिला. मंगळवारी मध्य, दक्षिण व दक्षिण नागपूर या तीन मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. बैठकीला राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, माजी आ.प्रकाश गजभिये, राजेंद्र जैन, दिनानाथ पडोळे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, सलील देशमुख, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष जावेद हबीब, प्रवक्ते श्रीकांत शिवरकर, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.