शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात पाच कीटकनाशकांवर बंदीचे कृषीमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 05:57 IST

जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटनाशकांची पुढील दोन महिन्यासाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरूवारी येथे दिली.

नागपूर : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना होत असलेल्या विषबाधेच्या घटनांची गंभीर दखल घेऊन अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटनाशकांची पुढील दोन महिन्यासाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरूवारी येथे दिली.बंदी घालण्यात आलेल्या कीटकनाशकांमध्ये प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सीपरमेथ्रीन ४० टक्के ईसी, फिप्रोनील ४० टक्के अधिक इमीडॅक्लोप्रीड ४० टक्के डब्ल्युजी, असिफेट ७५ टक्के एससी, डीफेन्थीरोन ५० टक्के डब्ल्युपी, मोनोक्रोटोफॉस ३३६ टक्के एसएल आदींचा समावेश आहे. कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या घटनांची दखल घेऊन केंद्र शासनाकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या कालावधीकरिता कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाची विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी सांगितले.>लोकमत इम्पॅक्ट : बुधवारी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत लोकमतच्या प्रतिनिधीने या विषयाकडे कृषिमंत्र्यांंचे लक्ष वेधत कीटकनाशकांवर बंदी घालणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या आदेशांवर ७ दिवसांपूर्वीच स्वाक्षरी केल्याचे सांगितले होते. परंतु अधिकाऱ्यांनी आदेश काढले नव्हते. तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून आदेश काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गुरूवारी बंदीबाबतचे नोटिफिकेशन तातडीने काढण्यात आले, हे विशेष.