लग्न होऊन तीन वर्षे झाली, तरी तरुण मैत्रिणीचा पिच्छा सोडण्यास नकार; नागपूरमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 09:16 IST2021-08-30T09:11:35+5:302021-08-30T09:16:05+5:30

मैत्रिणीने त्याच्यावर अतिप्रसंगाचा आरोप लावल्याने अजनी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

After three years of marriage, he refuses to give up his young girlfriend; Types in Nagpur pdc | लग्न होऊन तीन वर्षे झाली, तरी तरुण मैत्रिणीचा पिच्छा सोडण्यास नकार; नागपूरमधील प्रकार

लग्न होऊन तीन वर्षे झाली, तरी तरुण मैत्रिणीचा पिच्छा सोडण्यास नकार; नागपूरमधील प्रकार

नागपूर : लग्न होऊन तीन वर्षे झाली तरी मैत्रिणीचा पिच्छा सोडण्यास तयार नसलेला एक तरुण आता चांगलाच अडचणीत आला आहे. मैत्रिणीने त्याच्यावर अतिप्रसंगाचा आरोप लावल्याने अजनी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश उर्फ विराज रामभाऊ बोराटे (२७) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा पुण्याचा रहिवासी असून, अजनीतील एका २७ वर्षीय तरुणीसोबत त्याची २०१७मध्ये फेसबुकवरून ओळख झाली होती. नंतर त्यांची ऑनलाईन मैत्री बहरली.

दरम्यान, भेटीगाठीही वाढल्या अन् मैत्रिणीने दुसऱ्याच एका व्यक्तीशी लग्न केले. त्यामुळे बोराटे कासावीस झाला. त्याने मैत्रिणीसाठी पुणे सोडून नागपुरात मिळेल तो कामधंदा स्वीकारला. संधी मिळेल तेव्हा तो मैत्रिणीला भेटू लागला. अलिकडे ती त्याला टाळू लागल्याने त्याने चक्क तिचे घरच गाठले. २६ ऑगस्टला दुपारी १.३० च्या सुमारास बोराटे मैत्रिणीच्या घरी पोहोचला आणि त्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. समजूत काढूनही तो मानत नसल्याने मैत्रिण घाबरली आणि तिने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली.
 

Web Title: After three years of marriage, he refuses to give up his young girlfriend; Types in Nagpur pdc