शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मतभेदानंतर ठरले भाजपचे मंडळ अध्यक्ष

By admin | Updated: January 10, 2016 03:30 IST

भाजपच्या पक्षसंघटनेत अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मंडळ अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी बरीच रस्सीखेच झाली. स्थानिक पातळीवर बरेच मतभेदही झाले.

मेळाव्यात आज घोषणा : जुने सहाही अध्यक्ष बदलले नागपूर : भाजपच्या पक्षसंघटनेत अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मंडळ अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी बरीच रस्सीखेच झाली. स्थानिक पातळीवर बरेच मतभेदही झाले. होत असलेल्या विलंबावर शहर अध्यक्षांनी नाराजी केली. शेवटी मतभेदांकडे दुर्लक्ष करीत मंडळ अध्यक्षांची नावे निश्चित करण्यात आली. आज, रविवारी दुपारी ३ वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित मेळाव्यात नवनियुक्त मंडळ अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. भाजप पक्षसंघटनेत संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पार पडली. जुने सहाही मंडळ अध्यक्ष बदलायचे, असा निर्णय पक्षपातळीवर घेण्यात आला होता. त्यामुळे बरेच नवे चेहरे इच्छुक होते. यातूनच स्पर्धा वाढली. तीन मंडळांमध्ये आमदारांच्या मनात एक नाव होते तर स्थानिक कार्यकर्त्यांची पसंती दुसरीच होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वी पूर्व नागपूर, मध्य नागपूर व दक्षिण-पश्चिम नागपूर या तीन मंडळांच्या अध्यक्षाचे नाव निश्चित करून शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांच्याकडे सोपविण्यात आले होते. पश्चिम नागपूर, दक्षिण नागपूर व उत्तर नागपूर या तीन मंडळांमध्ये ताळमेळ जुळत नव्हता. त्यामुळे या तीन मंडळांच्या अध्यक्षांची नावे फायनल होत नव्हती. पूर्व नागपूर मंडळाच्या अध्यक्षपदी आ. कृष्णा खोपडे यांचे विश्वासू समजले जाणारे नगरसेवक महेंद्र राऊत यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी राऊत यांना खोपडे यांच्या आशीर्वादाने नामनिर्देशित नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करण्याची संधी देण्यात आली होती. मध्य नागपूर मंडळ अध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक कृष्णा कावळे यांचे नाव फायनल करण्यात आले. कावळे हे तीनवेळा नगरसेवक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या नावाला कुणाचाही विरोध झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण- पश्चिम नागपूरचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला होता. येथे प्रकाश भोयर यांचे नाव एकमताने निश्चित करण्यात आले.(प्रतिनिधी) उत्तरच्या अध्यक्षाबाबत पदाधिकाऱ्यांची नाराजीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर नागपूरच्या मंडळ अध्यक्षपदी दिलीप गौर यांची निवड करण्यात आली आहे. गौर हे सध्या उत्तर मंडळात महामंत्री आहेत. या पदासाठी नगरसेविका सुषमा चौधरी यांचे पती संजय चौधरी हे इच्छुक होते. ते ही सध्या उत्तर मंडळात महामंत्री आहेत. मात्र, गौर यांनी लावलेली फिल्डिंग वरचढ ठरली. आ. मिलिंद माने यांनी या प्रकरणी तटस्थ राहणे पसंत केले. गौर यांच्या निवडीमुळे नाराज झालेले विद्यमान मंडळ अध्यक्ष विक्की कुकरेजा व शहर महामंत्री प्रभाकर येवले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी रविभवनात उपेंद्र कोठे व रामदास आंबटकर यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. पश्चिममध्ये मित्रा- गावंडे टसल पश्चिम नागपूर मंडळ अध्यक्षपदासाठी किसन गावंडे व सुमित मित्रा या दोन विद्यमान मंडळ महामंत्र्यांमध्ये रस्सीखेच झाली. दोन्ही पदाधिकारी तुल्यबळ आहेत. मित्रा यांच्या पाठिशी पदाधिकाऱ्यांची एक चमू होती तर गावंडे यांना अखेरच्याक्षणी आ. सुधाकरराव देशमुख यांचे पाठबळ मिळाले. त्यामुळे गावंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दक्षिणमध्येही आमदारांचीच चलतीदक्षिण नागपूर मंडळाचे अध्यक्षपद निश्चित करताना आ. सुधाकर कोहळे यांचीच चलती राहिली. कोहळे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे व सध्या मंडळात महामंत्री असलेले संजय ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जुने कार्यकर्ते व महामंत्री विजय आसोले यांनीही अखेरपर्यंत दावा सोडला नाही. बऱ्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांची आसोले यांना पसंती होती. मात्र, कोहळेंच्या फेवरमुळे ठाकरेंना संधी मिळाली.