शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गँगस्टर आंबेकर शरण

By admin | Updated: March 3, 2016 02:52 IST

मोक्काअंतर्गत फरार असलेला कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकरला अखेर अटक करण्यात आली.

आर्थिक नाकेबंदी केल्याने शरणागती : पोलिसांचा दावानागपूर : मोक्काअंतर्गत फरार असलेला कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकरला अखेर अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची आर्थिक नाकेबंदी केल्यामुळे तब्बल ३५ दिवस फरार असलेल्या आंबेकरने बुधवारी सकाळी सोनेगाव पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्याच्यासोबतच प्रकाश मानकर यालासुद्धा अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे डीसीपी रंजनकुमार शर्मा आणि झोन-१ चे पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी ही माहिती दिली. सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत स्वप्नील बिडवई नावाच्या व्यक्तीच्या घरावर कब्जा करण्याप्रकरणी त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातील एकूण ११ आरोपीपैकी गौतम भटकर हा एकमेव आरोपी फरार आहे. सोनेगाव येथील बडवई यांचे घर बळकावण्यासाठी संतोष आंबेकर गँगने त्यांच्या घरावर हल्ला केला. घर खाली करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा भिंतीचीही तोडफोड केली. पोलिसांनी संतोष आंबेकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणात एकूण ११ आरोपी असून सचिन आडुळकर, विजय बोरकर, लोकेश कुभीटकर, युवराज माथनकर, आकाश बोरकर, शकती मनपिया, विनोद मसराम या आरोपींना अगोदरच अटक करण्यात आली आहे. बुधवारी संतोष आंबेकर आणि प्रकाश मानकर याला अटक करण्यात आली आहे. संतोष आंबेकरच्या शोधासाठी पोलिसांनी इंदोर आणि मुंबईलाही आपली चमू पाठविली होती. परंतु तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. बुधवारी सकाळी १०.३० वाजता तो तपास अधिकारी सोनेगावचे एसीपी शेखर तोरे यांच्या कार्यालयात हजर झाला. विचारपूस केल्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्याला अटक करण्यात आली. याचदरम्यान प्रकाश मानकर यालासुद्धा अटक करण्यात आली. डीसीपी बलकवडे यांनी सांगितले की, पोलिसांनी आंबेकरच्या घरी धाड टाकून चल-अचल संपत्तीचे दस्तऐवज जप्त केले होते. प्रवर्तन निदेशालय (ईडी) आणि आयकर विभागाला याची माहितीही देण्यात आली होती. पोलिसांनी आंबेकरची संपत्ती जप्त करण्याची कारवाईसुद्धा सुरू केली होती. या आर्थिक नाकेबंदीमुळेच तो पोलिसांना शरण आला. त्याला विचारपूस केली असता तो मुंबई, दिल्ली, इंदोर आणि अजमेर येथे गेल्याचे सांगत आहे. परंतु त्याने सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीवर पोलीस विश्वास ठेवायला तयार नाहीत. प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी तपासून पाहिल्या जात आहेत. तो पोलिसांची दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो खोटं सुद्धा सांगत असल्याचा संशय आहे. तो ज्या हॉटेलमध्ये थांबल्याचे सांगत आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले जातील. त्याला स्थानिक गुन्हेगारांनी मदत केल्याचाही संशय आहे. त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाईल. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवरही कारवाई आंबेकरला काही नेत्यांनी संरक्षण दिल्याचा प्रश्न उपस्थित केला असता, डीसीपी बलकवडे यांनी स्पष्ट केले की, संतोष आंबेकरला पोलिसांपासून लपविण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ज्यांनी मदत केली त्यांचा शोध घेतला जात आहे. यात कुणी आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई केली जाईल.