शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

नागपुरातील बहुचर्चित वकील अ‍ॅड. सतीश उके यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:29 IST

येथील बहुचर्चित वकील अ‍ॅड. सतीश उके यांना जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देजमिनीचे फसवणूक प्रकरण : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील बहुचर्चित वकील अ‍ॅड. सतीश उके यांना जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात  चर्चेला उधाण आले आहे.गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर वर्टीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभाराणी राजेंद्र नाकाडे (वय ६०, रा. पोलीस लाईन टाकळी) यांनी गेल्या वर्षी अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार, नाकाडे यांच्या नातेवाईकांची मौजा बाबुळगाव परिसरातील खसरा क्रमांक ८२/ २ ची दीड एकर जमीन होती. या जमिनीचे आममुख्त्यार पत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन अ‍ॅड. उके यांनी दुसऱ्यांना विकल्याचा आरोप नाकाडे यांनी तक्रारीतून केला होता. त्याची तक्रार अजनी ठाण्यात गेल्या वर्षी करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये हे प्रकरण गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी सोपविण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वर्टीकर यांनी या प्रकरणाची अडीच महिने चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी अ‍ॅड. उके यांना चौकशीसाठी गुन्हे शाखा कार्यालयात बोलविले. सायंकाळपर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम १२०, ४२०, ४२३, ४२४, ४४७, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ अन्वये गुन्हा दाखल करून अ‍ॅड. उके यांना अटक केली.१७ वर्षांपूर्वीचे प्रकरणपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण १७ वर्षांपूर्वीचे आहे. नाकाडे यांच्याकडून ही जमीन १९९१ मध्ये ऐश्वर्य गृहनिर्माण सोसायटीला ही जमीन विकण्यात आली होती. १० वर्षांनंतर अ‍ॅड. उके यांनी आममुख्त्यारपत्राचा (पॉवर आॅफ अटर्नी) वापर करत बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही जमीन त्यांनी दुसऱ्यांना विकून टाकली,असा आरोप आहे. या प्रकरणाला १७ वर्षे झाली असताना वर्षभरापूर्वी त्याची तक्रार नाकाडे यांनी केली. त्यानुसार, मंगळवारी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी उके यांना अटक केली.

पाच कोटींची जमीन, उकेंच्या भावासह एकूण तीन आरोपी या प्रकरणात पोलिसांनी अ‍ॅड. उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीप महादेवराव उके आणि चंद्रशेखर नामदेवराव मते (रा. पार्वतीनगर) यांनाही आरोपी बनविले आहे. या तिघांनी संगनमत करून जमिनीच्या सातबारावर नोंद असलेल्या मालकाला रीतसर नोटीस न देता अथवा संपर्क न करता सोसायटीची दीड एकर जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या जमिनीची किंमत पाच कोटी रुपये असल्याचे पोलीस सांगतात. 

टॅग्स :advocateवकिलArrestअटक