शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

संघाच्या विजयादशमी सोहळ्याला अडवाणी येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:35 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंदाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्दे२०१३ नंतरचा पहिलाच नागपूर दौरा : बाबा निर्मलदास प्रमुख पाहुणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंदाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे उपस्थित राहणार आहेत. सद्यस्थितीत राजकीय परिघातून काहीसे बाहेर गेलेले अडवाणी बºयाच कालावधीनंतर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.संघाच्या विजयादशमी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा हा उत्सव ३० सप्टेंबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री गुरू रविदास साधुसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. लालकृष्ण अडवाणीदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यांचा अधिकृत दौराच निश्चित झाला आहे. २९ सप्टेंबर रोजी ते दिल्लीहून रात्री ९.३० वाजता नागपूरला पोहोचतील. त्यानंतर वर्धमाननगर येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. सकाळी विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहून दुपारी १४.४० वाजता ते परत दिल्लीकडे रवाना होतील.या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.सरसंघचालकांची घेणार भेटभाजपातर्फे मोदी यांची निवडणूक प्रचार प्रमुखपदी झालेल्या निवडीनंतर नाराज झालेल्या अडवाणींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ५ जुलै २०१३ रोजी त्यांनी नागपुरात येऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अडवाणी यांची ही पहिलीच नागपूर भेट ठरणार आहे. विजयादशमी उत्सवानंतर अडवाणी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.