शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना मेळघाटातच शिक्षण देणार

By admin | Updated: July 8, 2014 01:12 IST

मेळघाटातून स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांना गुराढोरांप्रमाणे कोंबून नेणाऱ्या स्कूल बसचालकावर पोलिसांनी कारवाई केली असून मेळघाटातील विद्यार्थ्यांची पळवापळवी थांबविण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांनी

स्कूल बसेसविरुद्ध कारवाई : आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांची माहितीचिखलदरा : मेळघाटातून स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांना गुराढोरांप्रमाणे कोंबून नेणाऱ्या स्कूल बसचालकावर पोलिसांनी कारवाई केली असून मेळघाटातील विद्यार्थ्यांची पळवापळवी थांबविण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित आश्रमशाळा व्यवस्थापनाला दिले आहेत.मेळघाटातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना नियमबाह्यरित्या दुसऱ्या आश्रमशाळेत नेणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील शारदा ज्ञानमंदिरच्या दोन्ही स्कूल बसेसवर चिखलदरा व परतवाडा वाहतूक शाखेने कारवाई करून दंड ठोठावला. २८ प्रवासी क्षमता असलेल्या या स्कूलबसेसमध्ये १५५ विद्यार्थी कोंबून नेले जात असल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आला होता. युवक काँग्रेसचे मिश्रीलाल झाडखंडे, अमोल बोरेकार, राहुल येवले, पीयूष मालवीय आदींनी हा गंभीर प्रकार लक्षात येताच स्कूल बस थांबविल्या होत्या. दुसरी बस परतवाडा येथे थांबवून कारवाई करण्यात आली. या बसमधील विद्यार्थ्यांना रात्री १०.३० वाजता शासकीय वसतिगृहामध्ये सोडण्यात आले. तेथे त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तर काटकुंभ येथील स्कूलबसमधील विद्यार्थ्यांना डोमा येथील शासकीय आश्रमशाळेत ठेवण्यात आले. आश्रमशाळेतर्फे त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. धारणीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी संजय मीना यांनी रात्रीच संबंधित कर्मचाऱ्यांना तसे आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)