नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या ९५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ४७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६,९०० नागरिकांविरुद्ध कारवाई केली. १ कोटी ६८ लाख ९ हजाराचा दंड वसूल केला आहे. रेल्वे स्थानकावरही मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई सुरू आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}बुधवारी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत २४, धरमपेठ ४, हनुमाननगर १३, धंतोली १०, नेहरूनगर ५, गांधीबाग ३, सतरंजीपुरा ४, लकडगंज ८, आशीनगर १५, मंगळवारी झोनअंतर्गत ७ आणि मनपा मुख्यालयातील २ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविली जात आहे.