चंद्रपुरातून नागपुरात येऊन दुचाक्या चोरणाऱ्या आरोपीला अटक, चार वाहने जप्त

By योगेश पांडे | Published: July 7, 2023 05:16 PM2023-07-07T17:16:22+5:302023-07-07T17:21:35+5:30

चोरट्यांनी आणखी ठिकाणी हात मारला असल्याचा पोलिसांचा अंदाज

Accused who came to Nagpur from Chandrapur and stole bike arrested, four bikes seized | चंद्रपुरातून नागपुरात येऊन दुचाक्या चोरणाऱ्या आरोपीला अटक, चार वाहने जप्त

चंद्रपुरातून नागपुरात येऊन दुचाक्या चोरणाऱ्या आरोपीला अटक, चार वाहने जप्त

googlenewsNext

नागपूर : चंद्रपुरातून नागपुरात येऊन दुचाक्या चोरणाऱ्या आरोपीसह दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपींनी एकूण पाच दुचाक्या चोरल्याची बाब कबुल केली आहे. त्यांनी आणखी ठिकाणी हात मारला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

२९ मार्च रोजी नेमिचंद खेमराज विश्वकर्मा (५२, पारडी) यांची दुचाकी त्यांच्या घरातून चोरी गेली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता व गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारकडून समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधील सौदागर वडाला येथील साजीद खान पठान (३४) हा यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने अश्फाक शेख (२४, पारडी) याच्यासोबत मिळून विश्वकर्मा यांची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सोबतच पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी चार दुचाक्या चोरल्याचीदेखील त्याने माहिती दिली.

साजीदच्या ताब्यातून चार दुचाक्या जप्त करण्यात आल्या. अश्फाकचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी, अविनाश जायभाये, निरंजना उमाळे, सुनिल ठवकर, युवानंद कडू, चेतन पाटील, देवेंद्र नवघरे, पुरुषोत्तम काळमेघ, अतुल चाटे, निलेश ढोणे, सतेंद्र यादव, लीलाधर भेंडारकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Accused who came to Nagpur from Chandrapur and stole bike arrested, four bikes seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.