शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाचे पाकीट चोरी करणाऱ्या आरोपीस अटक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

नागपूर : धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशाचे पाकीट चोरी करणाऱ्या आरोपीला मोतीबाग रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात पकडले आहे. रविवारी रेल्वेगाडी ...

नागपूर : धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशाचे पाकीट चोरी करणाऱ्या आरोपीला मोतीबाग रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात पकडले आहे.

रविवारी रेल्वेगाडी क्रमांक ०८२४४ बनारस-बिलासपूर विशेष रेल्वेगाडीत नागपूरवरून दुर्गपर्यंत मोतीबाग रेल्वे सुरक्षा दलाचे जवान गस्त घालत होते. ही गाडी गोंदियाला पहाटे ४.३० वाजता पोहोचल्यानंतर एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत बाथरुममध्ये जाताना दिसला. शंका आल्यामुळे त्याला थांबवून विचारणा केली असता त्याने माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने आरक्षणाचे तिकीट काढून प्रवास करीत असल्याचे सांगितले. त्याने आपले नाव धर्मेंद्र कुमार सोनी (४९) रा. गोला रोड, रामजयपालनगर, पाटणा बिहार असे सांगितले. संशयाच्या आधारे त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ एक पाकीट आढळले. त्यात दोन हजार रुपये रोख आणि देवेंद्र वैष्णव या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स होते. आरपीएफ जवानांनी झोपेतील प्रवाशांना उठवून त्यांचे सामान तपासण्यास सांगितले असता, कोच क्रमांक ३ मधील प्रवासी देवेंद्र वैष्णवने त्याच्या ट्रॉलीबॅगमधून पाकीट चोरीला गेल्याचे सांगितले. ते आपल्या कुटुंबासह उज्जैन ते रायपूर असा प्रवास करीत होते. तक्रार मिळाल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशांचे साहित्य चोरी करीत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. दुर्ग लोहमार्ग पोलिसांनी हा गुन्हा गोंदिया लोहमार्ग पोलिसांकडे पाठविला आहे. ही कारवाई आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक मोहनलाल, शिपाई संदीप बांते, अमित राठी, विनय यादव यांनी केली.

...........