शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला सात वर्षे कारावास

By admin | Updated: April 17, 2016 02:54 IST

एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने एका आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

नागपूर : एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने एका आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भोला मारोती चकोले (३७) असे आरोपीचे नाव असून, तो मौदा तालुक्यातील मोहाडी येथील रहिवासी आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, १३ जानेवारी २०१४ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पीडित महिला ही मोहाडीहून मौदा येथील दवाखान्यात एकटीच पायी जात असताना मोटरसायकलने जात असलेल्या भोला चकोले याने तिला थांबवले होते. मौदा येथे सोडून देतो, असे सांगून मोटरसायकलवर बसवले होते. मारोडी गावाचे काही अंतर केल्यानंतर त्याने या महिलेला बाभळींच्या झाडात नेले. तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित वृद्धेच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी भादंविच्या ३७६, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक डब्ल्यू.आर. बुराडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रफुल्ल कटारिया तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. राम मासूरके यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे आणि सहायक फौजदार अरुण भुरे, वासुदेव मस्के यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)